खासगी शाळांच्या फी वाढीचा प्रश्न पेटला, पालक संघटनांचं थाळी बजाओ आंदोलन

| Updated on: Jun 13, 2021 | 3:43 PM

खासगी शाळांच्या फी वाढी विरोधात नागपुरात आज पालक संघटनांनी थाळी बजाव आंदोलन केले. या आंदोलनात पालक सुद्धा सहभागी झाले होते.

खासगी शाळांच्या फी वाढीचा प्रश्न पेटला, पालक संघटनांचं थाळी बजाओ आंदोलन
नागपूरमध्ये पालकांचं आंदोलन
Follow us on

नागपूर: महाराष्ट्रासह देशमभरात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून लॉकडाऊन करण्यात आले. कोरोना संकटामुळे शाळा मार्च 2020 पासून बंदआहेत. लॉकडाऊन आणि अनलॉकदरम्यान अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. शालेय शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं सुरु आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळांच्या फीच्या प्रश्नांवरुन शाळा व्यवस्थापन आणि पालकांमध्ये संघर्ष होत असल्याचं चित्र आहे. नागपूरमध्ये फी वाढीच्या मुद्यावरुन पालक संघटनांनी आंदोलन केलं आहे. (Nagpur Parents Association protest against school fee hike)

खासगी शाळांच्या फी वाढी विरोधात नागपुरात आज पालक संघटनांनी थाळी बजाव आंदोलन केले. या आंदोलनात पालक सुद्धा सहभागी झाले होते. पालकांनी शासन आणि खासगी शाळांचा थाली वाजवत निषेध नोंदवला. अनेक खाजगी शाळा या सरकारच्या नियमांचं पालन करत नाहीत, असा आरोप पालक संघटनांनी केला.

शाळा व्यवस्थापन आपली मनमानी करत फी वसूल करत आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा अनेक शाळांनी शाळा बंद असताना सुद्धा फी वसूल केली. ज्यांनी फी भरली नाही त्यांना शाळेतून काढण्यात आलं आहे, असा मनमानी कारभार या शाळा करत आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. अमित होसिंग पदाधिकारी पालक संघटना यांनी सांगितलं आहे.

शाळा 14 जूनला सुरु

पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सोमवार 14 जून 2021 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तर, जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार 28 जून 2021 रोजी शाळा सुरू होतील. या संदर्भात शिक्षण संचालकांकडून नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या आहेत.

वार्षिक सुट्ट्या 76 दिवसांपेक्षा कमी ठेवा

शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.


संबंधित बातम्या:

परळीत चोरांचा वावर वाढला, रात्री अनेक गाड्यांची तोडफोड, रस्त्याने जात असलेल्या नागरिकांनाही मारहाण

तरुणाचा यूट्युब पाहून बॉम्ब बनवण्याचा प्रयोग फसला, डिफ्युज करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव

(Nagpur Parents Association protest against school fee hike)