गाडीच्या सनरुफमधून डोकावाल तर थेट जेलमध्ये जाल, नागपूर पोलिसांचा आक्रमक पवित्रा
कारच्या सनरुफमधून बाहेर डोकावणे, किंवा कारच्या खिडकीच्या बाहेर डोकावत स्टॅंटबाजी करणाऱ्यांवर आता वाहतूक पोलीसांचा वॉच असणार आहे.
नागपूर : कारच्या सनरुफमधून बाहेर डोकावणे, किंवा कारच्या खिडकीच्या बाहेर डोकावत स्टॅंटबाजी करणाऱ्यांवर आता वाहतूक पोलीसांचा वॉच असणार आहे. कारच्या सनरुफवरुन किंवा खिडकीतून बाहेर डोकावल्यास थेट अटक करणार असल्याचं नागपूक वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आव्हाडे यांनी सांगितलंय.
नागपूरमध्ये रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांचं प्रमाणही वाढलंय. याच सुस्साट सुटलेल्या नागपूर ड्रायव्हरांना ब्रेक लावण्यासाठी नागपूर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यानुसार कारच्या सनरुफमधून बाहेर डोकावणे, किंवा कारच्या खिडकीच्या बाहेर डोकावत स्टॅंटबाजी करणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी थेट अटकेचा इशारा दिलाय.
नागपुरात सिमेंटच्या रस्त्यांचं जाळं, नागपूरकर सुस्साट
नागपुरातील रस्ते गेल्या काही दिवसांत चांगले झालेत. शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या रस्त्याचं जाळं आणि शिवाय उड्डाणपुलंही आहेत. यामुळे रस्त्यावर वाहनं चालवताना नागपूरकर सध्या सुसाट असतात. नागपूर वाहतूक पोलीसांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत नागपूरात ओव्हरस्पिडिंगचे प्रकार वाढलेय.
ओव्हर स्पिडिंग वाहन चालवणाऱ्या २२ हजार वाहन चालकांवर पोलिसांची कारवाई
त्यामुळे पोलिसांनी सहा महिन्यात रॅश ड्रायव्हिंग आणि ओव्हर स्पिडिंग वाहन चालवणाऱ्या 22 हजार वाहन चालकांवर कारवाई केलीय. शिवाय जानेवारीपासून रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांचे तब्बल 28 हजार ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आलेय. गेल्या सहा महिन्यातली ही राज्यातली सर्वाधिक कारवाई नागपूर शहरात झालीय.
(Nagpur police Action Mode Against Rash Nagpurkar Driver)
हे ही वाचा :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी नागपूर प्रशासन सज्ज, प्रतिबंधात्मक तयारी सुरु
नाशिकमध्ये डेल्टा प्लसचे मोठ्या प्रमाणात रुग्ण, नितीन राऊतांचा नागपूरकरांना ‘हा’ इशारा