तडीपार गुंड साथीदारांसह हॉटेलमध्ये शिरले, जीवे मारण्याची धमकी देऊन मागितली खंडणी, तक्रारीनंतर…

मी तडीपरीवरून आत्ताच वापस आलो. तुला जीवे मारीन, अशा प्रकारची धमकी दिली. त्याच्याकडून पाच हजार रुपये वसूल केले.

तडीपार गुंड साथीदारांसह हॉटेलमध्ये शिरले, जीवे मारण्याची धमकी देऊन मागितली खंडणी, तक्रारीनंतर...
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 6:06 PM

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाच्या पूर्वी दारावर राजा रेस्टॉरंट नावाचं एक हॉटेल आहे. त्या हॉटेल मालकाला तडीपार गुंडाने आपल्या तीन साथीदारासह हॉटेलमध्ये जात जीवे मारण्याची धमकी दिली. पाच हजार रुपये दर महिन्याला खंडणी देण्यास सांगितले. सोबतच मी तडीपरीवरून आत्ताच वापस आलो. तुला जीवे मारीन, अशा प्रकारची धमकी दिली. त्याच्याकडून पाच हजार रुपये वसूल केले. मात्र हॉटेल मालकाने या संदर्भाची तक्रार गणेशपेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली. एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

परिसरात भीतीचे वातावरण

तडीपारीवरून वापस आलो आहे. मी मोठा गुंड असून हा परिसर माझा आहे. म्हणून तू मला हप्ता दे अशी धमकी देणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र या परिसरात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

nag police 2 n

हे सुद्धा वाचा

पाच हजारांची खंडणी वसूल

याबाबत माहिती देताना गणेशपेठचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश गाडगे म्हणाले, १८ एप्रिल रोजी आठ वाजता चार गुंड हॉटेलमध्ये शिरले. आम्हाला ओळखलं नाही का, अशी धमकी हॉटेल मालकाला दिली. पाच हजार रुपयांची खंडणी वसूल केली. जाताना म्हणाले, दर महिन्याला आम्हाला पाच हजार रुपये द्यावे लागतील.

आणखी एका आरोपीचा शोध सुरू

पोलिसांना तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर आरोपींच्या शोधात पोलीस पथकं रवाना केले. आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यापैकी तीन आरोपी पोलिसांनी जेरबंद केले. त्यानंतर आणखी एक आरोपी फरार आहे. त्याचा शोधही पोलीस घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक गाडगे यांनी दिली.

तीन आरोपींना अटक

तडीपार गुंडाने आपल्या साथीदारांसह हॉटेल मालकाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर खंडणी मागितली असल्याची घटना नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत घडली. पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली तर, एकाच शोध घेत आहेत. या घटनेमुळे गणेशपेठ पोलीस परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आपल्या दुकानात कुणी खंडणीसाठी फोन तर करणार नाही, अशी भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.