Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Drone Ban | नागपुरात महत्त्वाच्या ठिकाणांवर 31 मार्चपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय

नागपूर (Nagpur) जिल्हा प्रशासनाने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या परिसरात ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी येत्या 31 मर्चपर्यंत कायम राहणार आहे.

Nagpur Drone Ban | नागपुरात महत्त्वाच्या ठिकाणांवर 31 मार्चपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी, सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय
NAGPUR POLICE AND DRONE
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 9:13 AM

नागपूर : नागपूर (Nagpur) जिल्हा प्रशासनाने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांच्या परिसरात ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी येत्या 31 मर्चपर्यंत कायम राहणार आहे. या निर्णयांतर्गत दीक्षाभूमी(Deekshabhoomi) , संघ मुख्यालय (RSS Headquarters), विमानतळ, वायुसेना मेन्टेनन्स कमांड मुख्यालय या परिसरात ड्रोन वापरावर बंदी असेल. या ठिकाणांच्या 2 किमी अंतरावर ड्रोन वापरावर बंदी असेल. तसे आदेश नागपूर पोलिसांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळ्यास कडक कारवाई केली जाणार आहे.

ड्रोन वापरास बंदी, पोलिसांचा नेमका आदेश काय ?

नागपूर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळालेली आहे. यामुळे सरक्षा म्हणून नागपूर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी नागपूर शहरातील महत्त्वाच्या काही ठिकाणाच्या दोन किलोमीटर परिसरात ड्रोन उडवण्यास बंद घातली आहे. यामध्ये दीक्षाभूमी, संघ मुख्यालय, विमानतळ, वायुसेना मेन्टेनन्स कमांड मुख्यालय अशा काही महत्त्वाच्या ठिकाणांचा समावेश आहे. ड्रोन उडवण्याच्या बंदीचा आदेश 31 मार्चपर्यंत कायम राहील. तसेच या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.

नागपुरात अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणं

नागपुरात दीक्षाभूमी, संघ मुख्यालय असे काही महत्त्वाचे ठिकाणं आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरातील दीक्षाभूमी या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळे समस्त आंबेडकरी जनतेसाठी हे स्थळ अतिशय पवित्र मानले जाते. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयदेखील नागपुरातच आहे. असे असताना येथे दहशतवादी हल्ला होण्याची गुप्त माहिती मिळाल्यामुळे पोलिसांनी वरील खबरदारी घेतली आहे.

संघ मुख्यालयावर आत्मघाती हल्ल्याचा डाव

दरम्यान, नागपुरातील संघ मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात आत्मघाती हल्ल्याचा डाव असल्याची माहिती 10 जानेवारी रोजी समोर आली होती. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून हा हल्ला होणार होता. या परिसराची रेकी करणारा जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख याला काही दिवसांपूर्वी श्रीनगर येथे सुरक्षा दलाकडून अटक केलीय. या रईसनं नागपुरात तीन दिवस मुक्काम ठोकून रेकी केली होती. या रेकीनंतर पाकिस्तानी दहशतवादी संघटनेकडून नागपुरात आत्मघाती हल्ल्याचा डाव होता, असं म्हटलं जातंय.

इतर बातम्या :

Ahmednagar School Reopen : अहमदगनरमध्ये आजपासून शाळा महाविद्यालय सुरु, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बंद घराचे कुलूप तोडून दरोडेखोर घुसले, समोर 23 वर्षीय तरुणी, मग… नागपुरातील हादरवणारी घटना

Rupali Thombre | हिंदुस्थानी भाऊच्या अटकेचे रुपाली ठोंबरेंकडून समर्थन, भडकाऊ भाईजान म्हणत मार्मिक ट्विट, म्हणाल्या…

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.