नागपूर पोलिसांना सलाम! वेदनेनं तडपडणाऱ्या गर्भवती महिलेची मदत, पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळं वाचला दोघांचा जीव, नेमकं काय घडलं?

पोलीस हा किती महत्वाचा घटक आहे आणि एखाद्या सहारा किंवा आधार नसलेल्या व्यक्तीला साठी तो कसा देवदूत ठरतोयाच उदाहरण नागपुरात पाहायला मिळालं.

नागपूर पोलिसांना सलाम! वेदनेनं तडपडणाऱ्या गर्भवती महिलेची मदत, पोलिसांच्या संवेदनशीलतेमुळं वाचला दोघांचा जीव, नेमकं काय घडलं?
Maharashtra police
Follow us
| Updated on: Sep 16, 2021 | 6:41 PM

नागपूर: पोलिसांबद्दल अनेक जणांनी वेगवेगळी मतमतांतरे आहेत. मात्र, पोलीस हा किती महत्वाचा घटक आहे आणि एखाद्या सहारा किंवा आधार नसलेल्या व्यक्तीला साठी तो कसा देवदूत ठरतोयाच उदाहरण नागपुरात पाहायला मिळालं. सकाळी 6 वाजता च्या दरम्यान गंगा जमुना या रेड लाईट एरिया परिसरात एक अनोळखी गर्भवती महिला फिरताना दिसली, त्यावेळी ड्युटी वर असलेल्या महिला पोलिसांनी तिला नाव पत्ता विचारण्याचा प्रयत्न केला मात्र ती काहीच सांगत नव्हती.तिच्या हालचाली वरून ती मतिमंद असल्याची जाणीव महिला पोलिसांना झाली.

पोलिसांच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केलं

महिलेच्या पोटात दुखत असल्याने ती जोरात रडत होती. पोलिसांनी आपली गाडी बोलावून तिला मेयो रुग्णालयात नेलं. डिलिव्हरी वॉर्ड मध्ये भरती करताच काही वेळात महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. आता आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेक. त्यानंतर पोलिसांनी तिला नाव विचारले त्यावरून तिच्या घराचा शोध पोलिसांनी घेतला आणि तिच्या आईला घेऊन आले. आईने पोलिसांना सांगितलं की ती विवाहित असून मतिमंद आहे रात्री ते घरातून निघून गेली घरचे तिचा शोध घेत होते मात्र ती मिळाली नाही.

पोलीस मदतीला धावले नसते तर काय?

पोलिसांनी जर हे सगळं केलं नसत तर त्या महिलेच काय झालं असतं? तिने जन्म दिलेल्या बाळाचं काय झालं असतं असे अनेक प्रश्न आहेत. मात्र त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी घेतलेला पुढाकार आणि दाखवलेली आत्मीयता यातून महिला आणि बाळ तर सुरक्षित आहेत. सोबतच त्या महिलेला तिचा परिवार सुद्धा मिळाला. पोलिसांच्या या कार्याबद्दल त्यांच नागपुरात कौतुक होऊ लागलं आहे.

नीट परीक्षेतील गैरप्रकार,  5 विद्यार्थ्यांना अटक

देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षांचं आयोजन केलं जातं. नागपूरमध्ये नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं उघडं झालं आहे. नीट परीक्षा रविवारी देशभरातील 202 शहरातील परीक्षा केंद्रावर पार पडली. मगंळवारी सीबीआयनं नागपूरमध्ये छापे टाकले होते. आता, नागपूरातील पाच विद्यार्थ्यांना सीबीआयने अटक केल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानं नागपूरमध्ये खळबळ माजली आहे. नागपूरमधील एका कोचिंग क्लासेसच्या संचालकालाही सीबीआयनं अटक केल्याचं समोर आलं आहे.

सीबीआयचा कोचिंग सेंटरवर छापा

नीट परीक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याप्रकरणी सीबीआयनं नागपूरमध्ये छापे टाकले होते. नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. मेडीकल कॅालेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी नीट परिक्षेत बोगस विद्यार्थी बसवल्याचं उघड झालं आहे. दिल्लीतील सीबीआयच्या टीमने नागपूरातील कोचिंग क्लासेसवर छापा टाकला होता.

इतर बातम्या:

CBI : नीट परीक्षेतील गैरप्रकार भोवला, नागपुरात 5 विद्यार्थ्यांसह कोचिंग क्लासच्या संचालकाला सीबीआयकडून अटक

नागपूरकरांवर नव संकट, डेंग्यूचा कहर, एका दिवसात 93 रुग्णांची वाढ

Nagpur Police help pregnant women and save life of woman and her child

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.