Hindustani Bhau : ‘रुको भाऊ सबर करो!’ हे आम्ही नाही तर पोलीसच म्हणतायत, मुंबईनंतर आता इथंही होणार चौकशी!
हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्याला तीन दिवस कोठडी मुक्कामी धाडलं, मात्र आता त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत, कारण हिंदुस्तानी भाऊला नागपूर पोलीसही ताब्यात घेणार आहेत.
नागपूर : सोमवारी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या घराबाहेर झालेल्या विद्यार्थी आंदोलनाने (Student Protest) संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. राज्य सरकारला तर या आंदोलनाने घाम फोडला. परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांचा लोंढा शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर जमाला. यावेळी पोलिसांकडून आंदोलकर विद्यार्थ्यांना आवरण्यासाठी सौम्य लाठीमार करण्यात आला. या आंदोलनाच्या मागे कोण आहे याचा शोध पोलिसांनी सुरू केल्यानंतर त्यांच्यासमोर हिंदुस्तानी भाऊ (Hindustani Bhau) हे नाव आलं त्यानंतर पोलिसांच्या हाती आंदोलनामागे असणार काही अन्य व्हिडिओही लागले. त्यानंतर हिंदुस्तानी भाऊला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टानं त्याला तीन दिवस कोठडी मुक्कामी धाडलं, मात्र आता त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत, कारण हिंदुस्तानी भाऊला नागपूर पोलीसही ताब्यात घेणार आहेत.
नागपुरात विद्यार्थ्यांनी वाहनांची तोडफोड केली
हे आंदोलन फक्त मुंबईतच नाही झालं, तर राज्यभर या आंदोलनाचे पडसाद उमटले. नागपुरातही विद्यार्थ्यांनी तोडफोड केली. हिंदुस्तानी भाऊवर त्याने विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून भडकावल्याचा आरोप आहे, त्याचे काही व्हिडिओ आणि आंदोलनावेळचे काही चिथावणीखोर व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेत. त्यामुळे नागपूर पोलीस सुद्धा त्याची चौकशी करणार आहेत, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. यानंतर हिदुस्थानी भाऊच्य सुटकेसाठी मुलांनी एकत्रित जमण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात जमण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अमान नावाच्या मुलाच्या नावे ही क्लिप सध्या व्हायरल होतेय.
हिंदुस्तानी भाऊचा पाय आणखी खोलात
मी अमान बोलतोय ग्रुपचा अॅडमिन. मी वांद्र्यात आलोय. इथे मी चौकशी केली वकिलांकडे इथे भाऊ नाहीत. भाऊना निघून अर्धा ते पाऊण तास झालाय. आता भाऊ धारावीत पोलीस कोठडीत आहेत. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जास्तीत जास्त संख्येने धारावीत या. आम्ही पण धारावीत जात आहोत. सर्वात जास्त आम्हाला मुलींची गरज आहे. मुली जास्त असतील तर पोलीस मारणार नाहीत. तेथे मीडिया पण आहे. आपली मैत्रीण, आपल्या बहिणी सर्वांना घेऊन या. जास्तीत जास्त विद्यार्थांना घेऊन या. कृपया सपोर्ट करा. लवकरात लवकर पोहचा, असे आवाहन या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आले आहे.