नागपूर विभागात दमदार पावसाची प्रतीक्षा, धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यांनी कमी, तूट भरुन निघणार?
राज्यात पाऊस सुरु झाला असला तरी नागपूर विभागात अजूनही धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नागपूर विभागात मागील वर्षाच्या तुलनेत 19.65 टक्के पाणी साठा कमी असल्याचं समोर आलं आहे.
नागपूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पावसानं पुनरागमन केलं आहे. राज्यात पाऊस सुरु झाला असला तरी नागपूर विभागात अजूनही धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. नागपूर विभागात मागील वर्षाच्या तुलनेत 19.65 टक्के पाणी साठा कमी असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात धरणक्षेत्रात पावसाची आवश्यकता आहे.
नागपूरच्या पाणीसाठ्याची तूट भरुन निघणार
नागपूर विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.65 टक्के पाणीसाठा कमी आहे. पाऊस कमी झाल्यानं नागपूर विभागात 384 धरणात 46.68 टक्के पाणी साठा आहे. हाच साठा मागील वर्षी 67.68 टक्के होता. सध्या पाणी साठा कमी असला तरी येणाऱ्या दिवसात तूट भरून निघण्याची शक्यता आहे. येणाऱ्या दिवसात पावसाची शक्यता आहे त्यामुळे तफावत भरून निघेल, अशी आशा आहे. मात्र, धरण क्षेत्रात पाऊस होण्याची शक्यता आहे.
Next 5 days weather warning for Vidarbha Dated 21.08.2021 #weatherwarning #imdnagpur #imd pic.twitter.com/dQQzZdDtTw
— Regional Meteorological Centre, Nagpur (@RMC_Nagpur) August 21, 2021
नागपूरच्या मेडिकलमध्ये ऑक्सिजन प्लांटची उभारणी
नागपुरातील मेडिकलमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्यात येणार आहे. पीएसएचे तीन प्लांट उभारले जाणार आहे. एम्स आणि मेयोमध्ये तीन तीन प्लांट उभारले जाणार आहेत.यामुळे ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन ची मोठी टंचाई निर्माण झाली होती. भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
नाशिकमध्ये समाधानकारक पाऊस
नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणांमध्य 61 टक्के पाणीसाठा झाला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात 79 टक्के तर दारणा समूहात 77 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून नाशिकमध्ये पावसानं चांगली हजेरी लावली आहे. पावसाच्या पुनरागमनाने बळीराजा सुखावला आहे.
इतर बातम्या:
राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी समृद्धी महामार्गाचे काम 74 टक्के पूर्ण; एकनाथ शिंदेंकडून पाहणी
Nagpur Rain update comparing to last year water storage low in Nagpur waiting for heavy Rain