कुठे बैठका-कुठे सभा, काँग्रेसचं सगळं ठरलंय, पण जागा वाटपाचं काय?; काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यामं सांगितलं

Ramesh Chennithala on Loksabha Election 2024 : ज्यांना जायचं त्यांनी लवकर जावं, कारण... पक्ष सोडून जाणाऱ्यांना काँग्रेसच्या वरिष्ट नेत्याचा सल्ला काय? राम मंदिराचं उद्घाटन हा राजनीती कार्यक्रम झालेला आहे. पंतप्रधानांकडून उद्घाटन होणार असेल तर हे राजकारण नाही काय?, असंही ते म्हणाले.

कुठे बैठका-कुठे सभा, काँग्रेसचं सगळं ठरलंय, पण जागा वाटपाचं काय?; काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यामं सांगितलं
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 8:56 AM

नागपूर | 18 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे. अशातच जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची चर्चा होतेय. शिवाय काही पक्षांतर होत आहेत. मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतर करणाऱ्या या नेत्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांने सल्ला दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पीसीसी एक्झिक्यूटिव्ह महाराष्ट्रातील सहा विभागामध्ये काँग्रेसच्या बैठकीचा आयोजन करण्यात आलं आहे. पहिली बैठकी नागपूर अमरावतीत होत आहे. काँग्रेसचं संघटन मजबूत करण्यासाठी शक्तिशाली बनवण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या बैठकांच आयोजन केलं आहे, असं रमेश चेन्निथला म्हणाले.

पक्षांतर करणाऱ्यांना सल्ला

मिलिंद देवरा यांच्या पक्षांतराबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राजनीतिक पक्षामध्ये आम्ही पक्ष आणि सत्तेसाठी नाही लढत.. एक आदर्श आणि विचारासाठी आम्ही पक्षात काम करत असतो. पण काही लोकांना पद नसले की ते लोक निघून जातात. जाणाऱ्यांमुळे त्याचा काँग्रेस पक्षाला काहीही नुकसान होणार नाही. पण महाराष्ट्र काँग्रेस सक्षम असून महाराष्ट्रातील नेते इतर पक्षात जाणार नाहीत, असं रमेश चेन्निथला यांनी म्हटलं.

जागावाटपावर म्हणाले…

महाविकासच्या जागावाटपावर रमेश चेन्निथला यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीतील मित्र पक्षांसोबत चर्चा झालेली आहे. येणाऱ्या दिवसात कोणाला किती जागा दिल्या जाईल. यावर शिक्कामोर्तब होईल. बऱ्याच ठिकाणी सहमती झालेली आहे. येत्या दिवासात फायनल लवकरात लवकर यादी जाहीर करू. पहिल्यांदा आदिवासी भागामध्ये गडचिरोलीमध्ये जाऊन आम्ही बैठक घेणार आहोत. शहरात नेहमीच बैठका होतात. म्हणून यावेळेस ग्रामीण भागात जात आहोत, असं त्यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण कथित खिचडी घोटाळा प्रकरणी अटक झाली आहे. यावरून रमेश चेन्निथला यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सीबीआय ईडी याचा दुरुपयोग होत आहे.. कधी भाजपच्या कुठल्या नेत्याच्या घरावर रेड पडली का? हे भाजपमधील कोणाला अटक झाली का? कारण भाजप विरोधकांवर ईडी सीबीआय लाऊन काम करत आहे. यानंतरही या देशातील विपक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडी यावेळी सरकार स्थापन करेल, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.