विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळेनात, दुसरीकडं बालभारतीकडून कोट्यवधीची हजारो टन पुस्तकं रद्दीत, RTI तून धक्कादायक माहिती समोर

2012 पासून बालभरतीनं वापरात नसलेली आणि जुन्या अभ्यासक्रमाची साडेपाच हजाराहून अधिक टन असलेली पुस्तके रद्दीत विकल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलंय.

विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळेनात, दुसरीकडं बालभारतीकडून कोट्यवधीची हजारो टन पुस्तकं रद्दीत,  RTI तून धक्कादायक माहिती समोर
बालभारती
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 4:16 PM

नागपूर: एकीकडे दुर्गम आणि ग्रामीण भागातील भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहोचत नसल्याचे चित्र आहे. मात्र, दुसरीकडे बालभारती मात्र हजारो टन पुस्तकं रद्दीत विकत आहे. 2012 पासून बालभरतीनं वापरात नसलेली आणि जुन्या अभ्यासक्रमाची साडेपाच हजाराहून अधिक टन असलेली पुस्तके रद्दीत विकल्याचं धक्कादायक वास्तव पुढं आलंय. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बालभारतीला या यासंदर्भातील माहिती माहितीच्या अधिकारात मागितली होती. त्यात हे वास्तव पुढं आलं.

पुस्तक नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान, हजारो टन पुस्तक रद्दीत

अनेक विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळत नसल्याची ओरड दर वर्षी असते. पुस्तकं न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं. मात्र, विद्यार्थ्यांपर्यंत न पोहचलेली हजारो मेट्रिक टन पुस्तकं रद्दीत विकली हात असल्याची माहिती या माहिती अधिकारातून पुढं आलीय.

चार वेळा पुस्तक रद्दीत

नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी 2012 पासून महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळाने किती पुस्तकं रद्दीत काढली आणि त्यापासून किती महसूल मिळाला, असे प्रश्न विचारले होते. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल 2012 ते मार्च 2019 या दरम्यान चार वेळा पुस्तकं रद्दीत काढण्यात आली. रद्दीत काढलेल्या पुस्तकाचे वजन 5 हजार 633 मेट्रिक टन एवढे होते. त्यापासून 6 कोटी 40 लाख एवढा महसूल मिळाला. यातून बालभारतीचे काम किती नियोजन शून्य आहे याची प्रचिती येते, असं माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या पुस्तकात भ्रष्टाचार, मेस्टाचा आरोप

‘मेस्टा’ संघटनेने विद्यार्थ्यांच्या पुस्तकात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केलाय. जाणीवपूर्वक पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जात नाही, रद्दी मधून पैसे खाता यावे, यात अधिकारी आणि मंत्री सहभाही असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ‘मेस्टा’ चे संस्थापक अध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी केलीय.

पुस्तक नेमकी कुणासाठी?

दरवर्षी महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मिती आणि अभ्यास संशोधन मंडळ पुस्तकांची छपाई करते. मात्र, अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं पोहचत नाही. त्यामुळं ही पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी छापली जातात की रद्दीत विकून भ्रष्टाचार करण्याची अशी शंका निर्माण झालीय.

इतर बातम्या:

‘बालभारती’कडून 426 टन पुस्तके रद्दीत, लाखो पुस्तकांचा कोट्यवधींचा छपाई खर्च पाण्यात

नंदुरबारमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा, आधी इंटरनेटचा गोंधळ, त्यात आता पुस्तक नाही

Nagpur RTI activist Abhay Kolarkar said Balbharati earn six crore rupees after sale of old books

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.