नागपूर : 17 ऑगस्टपासून ग्रामीण भागात पाचवी ते सातवी आणि शहरी भागात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु होणार आहे. शाळा सुरु व्हायला काही दिवसच बाकी आहे. पण तत्पूर्वी नागपुरातील शाळांमध्ये आजपासूनच लगबग पाहायला मिळतीय.
प्रत्येक वर्गखोली सॅनिटाईज केली जात आहे. वर्ग खोल्यांच्या स्वच्छतेवर भर दिला जात आहे. वर्गातील बेंचेसमध्ये ठराविक अंतर ठेऊन बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. तर विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर देखीत त्यांनी दर दोन तासांना हाताला सॅनिटाईज करावं, अशी व्यवस्था शाळेकडून करण्यात येतंय.
17 ॲागस्टपासून शाळा सुरु होणार आहे. पण शिक्षकांचं लसीकरण पूर्ण होणं गरजेचं आहे. बऱ्याचश्या शिक्षकांचं लसीकरणं झालेलं आहे, तर अद्याप काही शिक्षकांचं लसीकरण झालेलं नाही. अशा परिस्थितीत कोरोनाच्या महामारीत शिक्षक शाळा सुरु करण्यास तयार आहेत का? याची माहिती जाणून घेतली असता शिक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या.
राज्यातील ग्रामीण भागात दि 17 ऑगस्ट 2021 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरु करण्यास शासनानं परवानगी दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात मोठा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी महापालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर या जिल्ह्यात कोविड परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
(i) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
(ii) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद/ आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.
(iv) कोविड संबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. उदा. जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे, इ.
(v) विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करुन शाळा निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करुन घ्यावी व विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्लाने वैद्यकीय उपचार सुरु करावेत.
शाळा सुरू करताना मुलांना टप्प्या-टप्प्यात शाळेत बोलविण्यात यावे. उदा. वर्गांना अदला-बदलीच्या दिवशी सकाळी-दुपारी, ठराविक महत्वाच्या (core) विषयांसाठी प्राधान्य इ. हयासाठी सोबत जोडलेल्या मार्गदर्शन सूचना (SOP) चे पालन करावे.
संबंधीत शाळेतील शिक्षकांनी राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच शहरात / गावात करावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शक्यतो वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
(Nagpur School reopening Preparation After thackeray Government GR over Starting School )
हे ही वाचा :
मोठी बातमी ! राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश हवाय? नावनोंदणी सुरु, संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर