मोदी लाटेचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर किती परिणाम?; श्रीमंत मानेंनी ‘त्या’ मुद्द्याकडे लक्ष वेधलं

Hemant Bhosale on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या आधी कोण सत्तेत येणार? कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार निवडणूक जिंकेल? यावर राजकीय विश्लेषक श्रीमंत माने यांनी यांनी आपलं मत मांडलं. यंदाच्या निवडणुकीतील महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. वाचा...

मोदी लाटेचा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर किती परिणाम?; श्रीमंत मानेंनी 'त्या' मुद्द्याकडे लक्ष वेधलं
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 8:06 PM

लोकसभा निवडणुकीचं महाराष्ट्रातील मतदान झालं आहे. देशातील सहाव्या टप्प्यातील मतदान आज झालं. आणखी एका टप्प्यातील मतदान झालं की चार जूनला निकाल लागणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणत्या मुद्द्यांची सर्वाधिक चर्चा झाली? यावर राजकीय विश्लेषक श्रीमंत माने यांनी भाष्य केलंय. राष्ट्रीय पातळीवर मोठा मुद्दा नाही. लोकसभा निवडणुक असली तरी राज्यातील राजकीय समीकरणांवर लढली गेली आहे, असं श्रीमंत माने यांनी म्हटलं आहे. तसंच यंदाच्या निवडणुकीवर मुद्द्यांवरही श्रीमंत माने यांनी भाष्य केलंय.

शिवसेना राष्ट्रवादी फुटणे, एकनाथ शिंदे- अजित पवार भाजपसोबत असणं, या गोष्टींचा या निवडणुकीवर परिणाम झाला. पक्ष फुटीचा राज्यातील विषयावर आधारित ही निवडणूक झाली त्याचा परिणाम दिसला. मोदी लाट महाराष्ट्रामध्ये दिसली नाही. महाराष्ट्राची निवडणूक ही स्थानिक बाबीवर झाली. महायुती आणि मविआमध्ये तुल्यबळ निवडणूक झाली, असं श्रीमंत माने म्हणाले.

कुणाला किती जागा मिळण्याचा अंदाज?

महाराष्ट्रकडे देशाचा लक्ष लागण्याचं कारण म्हणजे दक्षिण भारत आणि उत्तर भारताचा मधला भाग महाराष्ट्र… भाजपची घट भरून काढणारी दोनच राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटक आहेत. महाराष्ट्रचा निकाल हा देशासाठी भाजपसाठी निर्णायक असा असेल. महाराष्ट्रामध्ये 22-24 जागा महायुतीला तर 24 ते 26 मविआला जागा मिळतील. किमान दोन जागांनी मविआ पुढे राहील, असं श्रीमंत माने यांनी म्हटलं.

महायुतीतील कोणत्या बाबी महत्वाच्या ठरल्या?

भाजपचा शिस्तबद्ध प्रचार हे महायुतीचा शक्तीस्थळ आहे. एकनाथ शिंदे यांनी जागा पदरात पाडून घेतल्या. त्याची सक्रियता हे शक्तीस्थळ होतं. अजित पवार हे सक्रियता ही जमेची बाजू होती. दोन पक्ष फुटल्या नंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दलची सहानुभूती हे महत्वाची होती. महाराष्ट्र मध्ये उद्धव ठाकरेंनी आक्रमक प्रचार केला तो महत्वाचा भाग आहे. एकही कागद न वाचता भाषण केलं. हा सभा घेतल्या, याचा फायदा मविआ होईल. लोकलच्या समीकरणामध्ये सर्वाधिक ठपका हा भाजपवर आहे. अजित पवार यांना सोबत घेतल्याने केडरमध्ये नाराजी होती. राष्ट्रवादी फुटल्या नंतर पवारांभवती राजकारण फिरवणं हे लोकांना आवडलं नाही, हा मुद्दाही श्रीमंत माने यांनी मांडला आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....