नागपूरात काँग्रेस-भाजप आमने सामने, ‘पालकमंत्री आणि त्यांच्या मुलाकडून पोलिसांवर दबाव’, भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांचा आरोप
नागपूरात (Nagpur) भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाचे सत्र हे सुरू झाले आहे. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. भाजप (BJP) नगरसेवक विक्की कुकरेजा (Vicky Kukreja) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नागपूर : नागपूरात (Nagpur) भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपाचे सत्र हे सुरू झाले आहे. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. भाजप (BJP) नगरसेवक विक्की कुकरेजा (Vicky Kukreja) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष बघायला मिळतो आहे. महानगरपालिका निवडणूक तोंडावर आल्यामुळे अशाप्रकारचे घाणेरडे राजकारण सुरू असल्याचे देखील बोलले जात आहे.
भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांचा गंभीर आरोप
यासर्व प्रकरणावर भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. पालकमंत्री नितीन राऊत आणि त्यांचा मुलगा कुणाल राऊत यांच्या दबावात पोलीस काम करत आहेत. काँग्रेसच्या गुंडांनी काल तोडफोड केली, महानगरपालिका निवडणूकीपूर्वी षड्यंत्र करुन अशाप्रकारे तोडफोड सुरु आहे.” असा आरोप भाजप नगरसेवक विक्की कुकरेजा यांनी केलाय.
जरीपटका पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करणार
इतकेच नाहीतर नगरसेवक विक्की कुकरेजा पुढे म्हणाले की, पोलिसांनी काल तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. जर उद्यापर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही तर उद्या भाजप 11 वाजता जरीपटका पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा आता भाजपने दिला आहे. सत्तेचा दुरुपयोग करणारे पालकमंत्री नितीन राऊत यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी कुकरेजा यांनी केली आहे. यामुळे आता हे सर्व प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :