Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर हिंसाचारात 34 पोलीस जखमी, 4 नागरिकांना जबर मार, 45 वाहनांची तोडफोड; आकडेवारी आली समोर, बावनकुळेंचा इशारा काय?

Nagpur Violence : नागपूर हिंसाचारात 34 पोलीस जखमी, 4 नागरिकांना जबर मार, 45 वाहनांची तोडफोड झाली आहे. या घटनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरकरांसह राज्यातील जनता, विरोधकांना मोठे आवाहन केले आहे.

नागपूर हिंसाचारात 34 पोलीस जखमी, 4 नागरिकांना जबर मार, 45 वाहनांची तोडफोड; आकडेवारी आली समोर, बावनकुळेंचा इशारा काय?
नागपूर हिंसाचारImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 18, 2025 | 11:51 AM

नागपूर हिंसाचारात 34 पोलीस जखमी, 4 नागरिकांना जबर मार, 45 वाहनांची तोडफोड झाली आहे. औरंगजेबाची प्रतिकात्मक खबर जाळण्याचे आंदोलन काल झाले होते. त्यानंतर काल संध्याकाळी अचानक हिंसाचार सुरू झाला. या घटनेत जवळपास ट्रॉलीभर दगड पोलिसांनी जमा केले आहे. हा पूर्वनियोजीत कट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. तर या घटनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरकरांसह राज्यातील जनता, विरोधकांना शांततेचे आवाहन केले आहे.

नागपूरमध्ये शांतता नांदू द्या

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिस, जिल्हाधिकारी, प्रशासकीय यंत्रणा यांच्यासोबत सकाळीच बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी लागलीच पत्र परिषद घेतली. सोशल मीडियावरून चुकीचा अफवा पसरवल्या जात आहे त्यावर लक्ष ठेवत आहे. तणावपूर्ण भागात पोलीस बंदोबस्त लावला आहे. नागपूरात हिंदू मुस्लिम एकत्र राहातात. समाजकंटक जे नागपूरला कलंक लावत आहेत, त्यांच्यावर लवकरच कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले.

हे सुद्धा वाचा

तर याप्रकरणी आता सर्वांनी अगोदर नागपूर शांत करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. घाईघाईने कोणतेही वक्तव्य करता येणार नाही. या घटनेनंतर सर्वांनी संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. नागपूर या प्रकरणाचा शोध घेतली. सोशल मीडियाचे खाते तपासली जातील. मुख्य सूत्रधार कोण याचा शोध सुरू असल्याचे ते म्हणाले.

विरोधकांना केले मोठे आवाहन

विरोधकांनी या घटनेकडे राजकीय म्हणून पाहू नये. काही समाजकंटक या गोष्टी करत असतात. त्यामुळे राजकीय टिप्पणी करू नका. पोलीस आणि सर्वांना सहकार्य करा. आपण सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावं. आपला सलोखा कायम ठेवावा, असे बावनकुळे म्हणाले.

पोलिसांना सहकार्य करावे

सर्व समाजाने सर्वांनी अशा घटनेत शांत राहून शांतता प्रस्थापित करून या मागचे मूळ समाजकंटक आहेत. त्यांना शोधण्यासाठी आम्ही पोलिसांना सहकार्य करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालपासूनच या घटनेला गांभीर्याने घेतलं आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्तांशी त्यांचा सातत्याने संपर्क आहे. ही घटना वाढू नये, त्याचे पडसाद उमटू नये म्हणून प्रयत्न सुरू आहे. पोलीस अॅक्शन मोडमध्ये आहेत. पोलिसांनी प्रचंड क्षमतेने पुढाकार घेऊन ही परिस्थिती हाताळली आहे.

सोशल मीडियातून नागपूरचं वातावरण बिघडवलं. अनेक सोशल मीडिया अकाऊंटमधून हे वातावरण भडकवलं. त्यातून दोन समाजात द्वेष निर्माण झाला. त्यातून ही घटना घडली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी आणि आम्ही सर्वांनी नागपूर शहर शांत ठेवण्याचं आवाहन केलं आहे. भाजपचं युनिट शहर शांत करण्यासाठी काम करत आहे. सरकार म्हणून आम्ही सहकार्य करत आहोत. वस्त्या वस्त्यात जाऊन लोकांना शांत केलं जात आहे. राज्यात अशा घटना घडू नये यासाठी फडणवीस लक्ष देऊन आहेत. पोलिसांनी चांगल्या प्रकारे घटना हाताळली आहे. त्यामुळे होणारं मोठं नुकसान टाळलं. दोन गटातील मोठा संघर्ष टळलं आहे. नागपूरमध्ये जिथे जिथे परिस्थिती आहे. तिथे योग्य संचारबंदी करण्यात येणार आहे. कुठेही घटना घडणार नाही याची काळजी पोलीस घेत आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

पर्याप्त एसआरपी आणि पोलिसांचा बंदोबस्त आहे. पुन्हा घटना घडणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांचा फोर्स अधिक आहे. आमचं लक्ष सोशल मीडिया अकाऊंटवर आहे. महापालिकेने, कलेक्टर, पोलिस आयुक्तांनी सकाळपासून आपआपल्या विभागात अभियान सुरू ठेवलं आहे.

या राड्याचा तपास सुरू आहे. ही घटना कुठून सुरू झाली आणि कुठे संपली याचा शोध घेत आहे. आज सर्वांना शांत करणं, शहरातील कामकाज सुरळीत करणं हे प्राधान्य आहे. मूळ शोधणारचं आहे. पण आज प्राधान्य शांतता प्रस्थापित करणं, एक दोन दिवसात संचारबंदी उठवता येईल असं वातावरण करणं हे आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

राज्यात पोलीस अलर्टवर

औरंगजेब कबरी संदर्भात नागपूर शहरातील झालेल्या घटनेनंतर राज्यभर पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या मालेगावात शांतता आहे. मालेगावात काल हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले होते. तर अमरावती शहरातील अनेक भागात पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. नागपूर सारखाच अमरावतीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क आहेत. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी कालच अमरावती शहरातील अनेक भागांची पाहणी केली आहे.

बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार
बिग बॉसचा सीझन आठवला, रोहिणी खडसेंच्या टीकेवर चित्रा वाघ यांचा पलटवार.
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा.
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात
'...हा सरकारचा खोटानाटा खेळ', सुप्रिया सुळेंचा घणाघात.
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच.. अहवालात नेमकं काय?.
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा
6 महिने..., मुंडेंच्या आमदारकीच्या राजीनाम्यावरून करूणा शर्मांचा दावा.
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत
भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी - संजय राऊत.
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'
करूणा शर्मा म्हणाल्या ,'15 लाखांची मागणी, मात्र मुंडे 2 लाख पोटगीपण..'.
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका
महिलेकडे काय आहे की तिला 1 कोटी द्यावे लागले? विरोधकांची गोरेंवर टीका.
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका
'बाई काय हा प्रकार...,बिग बॉसमधील 'तो' व्हिडीओ ट्वीट करत खडसेंची टीका.
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा
'एक बाई विचित्र आवाजात किंचाळल्या...' ,आंधारेंचा चित्रा वाघांवर निशाणा.