Video | नियम मोडून महिला घराबाहेर पडली; कारवाई करताच शिवराळ भाषेचा वापर, पेटवून घेण्याचीही धमकी

पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या महिलेने गाडीतील पेट्रोल काढून स्वत:ता पेटवून घेण्याचासुद्धा प्रयत्न केला. (nagpur police women offensive word)

Video | नियम मोडून महिला घराबाहेर पडली; कारवाई करताच शिवराळ भाषेचा वापर, पेटवून घेण्याचीही धमकी
महिलेने अशा प्रकारे पोलिसांशी हुज्जत घातली
Follow us
| Updated on: Mar 19, 2021 | 12:05 AM

नागपूर : शहरात लॉकडाऊन असतानासुद्धा निनाकारण घराबाहेर पडल्यानंतर आडवल्यामुळे एका महिलनेने पोलिसांना शिविगाळ केल्याचा प्रकार नागपूरमध्ये घडला. या प्रकारामुळे दहा ते पंधरा मिनिटं परिसरात तणावाचं वातावरण होतं. यावेळी पोलिसांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यानंतर या महिलेने गाडीतील पेट्रोल काढून स्वत:ता पेटवून घेण्याचासुद्धा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Nagpur women abuse Police and used offensive word tried to suicide)

लॉकडाऊ असूनसुद्धा महिला घराबाहेर पडली

राज्यात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. नागपूरमध्ये तर कोरोनाची स्थिती चिंताजनक आहे. वाढते कोरोना रुग्ण लक्षात घेता येथील प्रशासनाने नागपूर शहरात लॉकडाऊन जारी केलेला आहे. एका दुचाकीवरुन  फक्त एका व्यक्तीला प्रवास करण्यास परवानगी आहे. यामुळे एखादी व्यक्ती कोणत्याही कारणाशिवाय बाहेर पडल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येतेय. दरम्यान पोलिसांची नजर चुकवत इतवारी भागातील एका छोट्या गल्लीतून एक महिला आपल्या मुलीसोबत घराबाहेर पडून मोपेडवरुन जात होती. यावेळी पोलिसांनी तिला घराबाहेर का निघाली असा सवाला केला.

महिलेने अशा प्रकारे पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ केली, पाहा व्हिडीओ  :

महिलेची पोलिसांना शिवीगाळ

पोलिसांनी अडवल्यानंतर ही महिला पोलिसांशी भिडली. तिने पोलिसांशी हुज्जत घालणे सुरु केले. तसेच, पोलिसांनी अडवल्यामुळे या महिलेने पोलिसांनी पोलिसांना शिव्यासुद्धा दिल्या. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये व्हिडीओच्या माध्यमातून कैद करण्यात आलाय. कारवाई करत असताना या महिलेने पोलिसांशी वाद घालत चांगलाच गोंधळ घातला.

पेटवून घेण्याचा प्रयत्न

पोलिसांनी कारवाईचा पवित्रा घेतल्यानंतर ही महिला अजूनच खवळली. तिने चक्क गाडीतले पेट्रोल काढून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी पोलीस आणि बाजूचे नागरिक यांच्या सतर्कतेमुळे कोणत्याही गैरप्रकार घडला नाही.

दरम्यान, या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. महिलेच्या गोंधळाचा तसेच शिवराळ भाषेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

इतर  बातम्या :

Video | बापरे ! केस कापण्यासाठी चक्क चाकू आणि हातोड्याचा वापर, व्हिडीओ एकदा पाहाच

Special Report | अंबानी स्फोटकं प्रकरणात मर्सिडीज आणि प्रॅडोचं नेमकं कनेक्शन काय ?

Antilia Bomb Case | अंबानी स्फोटकं प्रकरणी पाचवी गाडी जप्त

(Nagpur women abuse Police and used offensive word tried to suicide)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.