नागपूरकरांना पाणी दरवाढीचा झटका; पाण्याच्या दरात पाच टक्क्यांची वाढ
महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढतच आहे. इंधनाचे (fuel) दर गगनाला भिडले आहेत. दैनंदीन वस्तूंच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईत नागपूरकरांना आता पाणी दरवाढीचा (Water price hike) झटका बसल्याचे समोर आले आहे. नागपुरात पाण्याच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
नागपूर : महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढतच आहे. इंधनाचे (fuel) दर गगनाला भिडले आहेत. दैनंदीन वस्तूंच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. वाढत्या महागाईत नागपूरकरांना आता पाणी दरवाढीचा (Water price hike) झटका बसल्याचे समोर आले आहे. नागपुरात पाण्याच्या दरात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. आधीच नागपूर शहरात पाणीटंचाई आहे. त्यात आता भरीस भर म्हणजे पाणीदरात वाढ करण्यात आली आहे. नागपूर मनपा आणि ओसीडब्लूच्या करारानुसार दरवर्षी पाण्याच्या दरात वाढ करण्यात येते. गेल्यावर्षी कोरोनामुळे पाणी दरवाढ झाली नव्हती, गेल्या 12 वर्षांमध्ये 11 वेळेस पाण्याच्या दरात वाढ झाली आहे. महागाई गगनाला भिडली आता त्यात पाणी दरात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने नागपूरकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पाणी पट्टी वेळेत भरून देखील पाणीटंचाईची समस्या कायम असल्याचे नागपूरकरांनी म्हटले आहे.
पाणीपुरवठ्याची जबाबदारी ओसीडब्ल्यूकडे
शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नागपूर महापालिकेने ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) कंपनीला दिली आहे. महापालिका व ओसीडब्यू यांच्यातील करारानुसार दरवर्षी पाच टक्के पाणी दरवाढ प्रस्तावित आहे. त्यानुसार नागपूरकरांना दरवर्षी पाणी दरवाढ सहन करावी लागते. मात्र गेल्या वर्षी कोरोनामुळे पाण्याच्या दरात वाढ करून नये असा ठराव महापालिकेच्या सभागृहात मंजूर करण्यात आला होता. कोरोनामुळे नागरिकांची परिस्थिती बिकट झाली होती. या पार्श्वभूमीवर पाण्याच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता, मात्र यंदा पुन्हा एकदा पणी दरवाढ करण्यात आली आहे.
पाण्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?
दरम्यान गेल्या बारा वर्षांमधील ही आकरावी दरवाढ आहे. या दरवाढीमुळे आता नागरिकांना 20 युनिटपर्यंत पाणी वापरासाठी प्रति युनिट 8 रुपये 55 पैसे मोजावे लागणार आहेत. तर पुढील दहा युनिटसाठी हेच दर 13 रुपये 68 पैसे इतके असणार आहेत. अशी माहिती नागपूर महापालिकिच्या वतीने देण्यात आली. पाणी दरवाढीचा मोठा आर्थिक फटका हा नागपूरकरांना बसणार आहे.