Nagpur : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा, 18 तासांसाठी काही विभागात पाणी पुरवठा बंद

दुरूस्तीचं काम झाल्यानंतर पाणी पुरवठा कमी दाबाने पुरवठा केला जाणार आहे. दोन दिवसांनी पाणी पुरवठा सुरळीत होईल असं पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.

Nagpur : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा, 18 तासांसाठी काही विभागात पाणी पुरवठा बंद
पाण्याचा जपून वापर कराImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 8:35 AM

नागपूर – महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक जिल्ह्यात पावसाळ्यापुर्वी पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) दुरूस्ती कामे हाती घेतली आहेत. जी कामं अत्यंत महत्त्वाची आहेत अशी काम तात्काळ करण्याचं ठरवलं आहे. तसेच अनेक कामं पावसाळ्यात कर्मचाऱ्यांना करण शक्य होत नाही अशी काम मान्सून पावसापुर्वी केली जात आहेत. नवीन जलकुंभ उभारण्यात आले आहे, त्या जलकुंभाच्या जोडणी करीता मंगळवारी दिवसभर नागपूरात (Nagpur) पाणी पुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. पालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पत्रकात पालिकेला सहकार्य करावे असं देखील म्हटलं आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, ठाणे या जिल्ह्यात देखील दुरूस्तीची कामे नुकतीच झाली आहेत.

या परिसरात पाणी पुरवठा पुर्णपणे बंद

धरमपेठ

लक्ष्मीनगर

हे सुद्धा वाचा

हनुमान नगर

पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे

नागपुरातील चार झोन मधील जलकुंभाचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. त्यामध्ये धरमपेठ ,लक्ष्मीनगर, हनुमान नगर या परिसरात पाणी पुरवठा होणार नाही. दुरूस्तीचं काम झाल्यानंतर पाणी पुरवठा कमी दाबाने पुरवठा केला जाणार आहे. दोन दिवसांनी पाणी पुरवठा सुरळीत होईल असं पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे. नवीन जलकुंभ उभारण्यात आले आहे, त्यांच्या जलकुंभाच्या 1200 मी.मी व्यासाच्या जलवाहिनी वर आंतरजोडणी च्या कामासाठी 18 तास पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

जुलै अखेरीस पुरेल एवढा पाणी पुरवठा शिल्लक

यंदा लोकांनी महाराष्ट्रात चांगलाच उन्हाळा पाहायला मिळाला. सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे लोकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या धरणात जुलै अखेरीस पुरेल एवढा पाणी पुरवठा शिल्लक आहे. यंदा सुध्दा चांगल्या पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

त्यामुळे पुढच्यावर्षी देखील पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण होणार अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.