क्राईम कॅपिटलकडून सुरक्षित शहराकडे नागपूरची वाटचाल!, फेब्रुवारी महिन्यात खुनाची एकही घटना नाही

नागपुरात फेब्रुवारी महिना खुनाच्या घटनेविना गेला. याबद्दल नागपूर पोलीस आयुक्तांनी नागपूरकरांचे आभार मानले. गुन्हेगार आणि अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम राबवल्याचे हे यश असल्याचे आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. नागपुरात दरवर्षी खुनाच्या सुमारे शंभर घटना घडतात.

क्राईम कॅपिटलकडून सुरक्षित शहराकडे नागपूरची वाटचाल!, फेब्रुवारी महिन्यात खुनाची एकही घटना नाही
पत्रकार परिषदेत बोलताना नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 12:25 PM

नागपूर : हत्येच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या उपराजधानी नागपुरात (Nagpur City ) गेल्या फेब्रुवारी महिन्यात हत्येचा एकही गुन्हा दाखल नाही. नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिन्याभरात एकही हत्या झालेली नाही. नागपूर शहर हे क्राईम कॅपिटल (Crime Capital) म्हणून ओळखलं जाते. महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीत शहर असलेलं नागपूर हत्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ( National Crime Records Bureau) आकड्यांनुसार देशात सर्वाधिक हत्या होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचे नाव आघाडीवर होते. मात्र, याच नागपूर शहरात फेब्रुवारी महिन्यात एक सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही. ही नागपूरकर आणि पोलिसांसाठी दिलासादायक बातमी आहे.

कारवाईतून सुटलेल्यांवर नजर

गेल्या काही महिन्यांमध्ये नागपूर शहरात अनेक मोठी हत्याकांड घडली. ज्यामुळं नागपूर पोलिसांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, नागपूर शहरांमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एकही हत्या न होण्यामागे पोलिसांनी केलेली विशेष उपाययोजना आणि जनतेच्या विश्वास संपादन करण्यात पोलिसांना यश, यामुळं हे शक्य झाले असल्याची प्रतिक्रिया नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय. कारवाईतून सुटलेल्यांनाही लवकरच जेलची हवा दाखविणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिली.

पोलिसांचा धाक निर्माण झाला

पोलीस आयुक्त म्हणाले, खुनाच्या घटना रोखणे ही प्राथमिकता होती. छोट्या-मोठ्या गुन्ह्यावरून आरोपींवर कारवाई केली. एमपीडीएच्या विक्रमी कारवाया केल्याने आरोपींमध्ये धाक निर्माण झाला. काही आरोपी सुटले असतील तर त्यांनाही जेलची हवा दाखविणार असल्याचं पोलीस आयुक्त म्हणाले. दारुचा व्यापारी अशोक वंजानीविरुद्ध हप्तावसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. वंजानीला तडीपार करण्याची कारवाई सुरू आहे. पप्पू अवस्थी व निषेध वासनिक टोळीविरुद्ध मकोमाची कारवाई केली असल्याचंही आयुक्त यांनी सांगितलं.

Nagpur | कोमात असताना प्रसूती, मेंदूवर शस्त्रक्रिया! डॉक्टरांनी वाचविले आईसह बाळाचे प्राण

आधी सरण रचले, पूजा केली नंतर स्वतःला जाळून घेतले, नागपुरात वृद्ध व्यक्तीनं असं का केलं?

पित्याची आत्महत्या, तीन दिवसांनी मुलीच्या बॅगमध्ये सुसाईड नोट सापडली, एकाला अटक

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.