Nagpur RSS | हैदराबादचे भाग्यनगर असं नामकरण? आरएसएसच्या टि्वटर हँडलवर उल्लेख; पाच ते सात जानेवारीला भाजपसोबत बैठक

संघाशी संलंग्नित संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भाग्यनगर तेलंगणा येथे 5 ते 7 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आली आहे. संघाच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरील ट्वीटमध्ये भाग्यनगरचा उल्लेख करण्यात आला आहे.

Nagpur RSS | हैदराबादचे भाग्यनगर असं नामकरण? आरएसएसच्या टि्वटर हँडलवर उल्लेख; पाच ते सात जानेवारीला भाजपसोबत बैठक
आरएसएसकडून करण्यात आलेले टि्वट.
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 1:28 PM

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. संघाच्या ट्वीटमध्ये हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा करण्यात आलाय. भाजप आणि संघाच्या अजेंड्यावर हैदराबादच्या नामांतराचा मुद्दा, तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

योगी आदित्यनाथांनी केला होता उल्लेख

हैदराबादचे नाव बदलवून भाग्यनगर करण्याचा उल्लेख हैदराबाद महापालिका निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हा मुद्दा घेतला. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसस) पुन्हा हैदराबादचे भाग्यनगर करण्याचा मुद्दा उचलला आहे. संघाने आपल्या ट्टिटमध्ये हैदराबादलचा उल्लेख भाग्यनगर असा केला. भाजप आणि संघ हा विषय उचलून धरताना दिसत आहेत.

टि्वटमध्ये भाग्यनगर असा उल्लेख

जानेवारीमध्ये संघ आणि भाजपची तीन दिवसीय समन्यव बैठक होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टि्वटर हँडलवर याची माहिती दिली. त्यामध्ये सुनील आंबेकर यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संबंधित विविध क्षेत्रात कार्यरत संघटनांचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पाच ते सात जानेवारी २०२२ ला भाग्यनगर (हैदराबाद) तेलंगाणा येथे होत आहे. टि्वटमध्ये संघाने स्पष्टपणे शहराच्या नामांतरणाची मागणी केलेली नाही. पण, हैदराबादचा उल्लेख भाग्यनगर असा केला आहे.

मोहन भागवत, जे. पी. नड्डा बैठकीत राहणार?

जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात संघ आणि भाजपची तीन दिवसीय समन्वय बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत संघटनांशी संबंधित कामकाजाची समीक्षा केली जाईल. शिवाय पुढील काळात पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीशी संबंधित चर्चा केली जाईल. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, पक्षाचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष आणि संयुक्त महासचिव शिव प्रकाश आणि संघटनेच्या प्रमुख कार्यकर्ते या बैठकीत भाग घेतील.

विधानसभा निवडणुकांविषयी होणार चर्चा

याशिवाय भाजप प्रतिनिधी येणाऱ्या वर्षातील कार्यक्रमांबद्दल माहिती देणार आहेत. बैठकीत उत्तर प्रदेश, पंजाब, मणीपूर, उत्तराखंड आणि गोवा येते होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशी संबंधित चर्चा होईल. भाजप आणि आरएसएस यांच्यात अशाप्रकारच्या बैठका होत असतात. यंदा जूनमध्ये उत्तर प्रदेशात समन्वय बैठक झाली होती. त्यामध्ये भाजप महासचिव बी. एल. संतोष यांनी भाग घेतला होता.

सत्तेत आल्यानंतर भाजपकडून नामांतरण

मुख्यमंत्री योगी म्हणाले, फैजाबादचे नामकरण अयोध्या असे होऊ शकते. इलाहाबादचे नामकरण प्रयागराज असे होऊ शकते. मग, हैदराबादचे भाग्यनगर असेही होऊ शकते. काही लोकं मला यासंदर्भात विचारणा करतात. तेव्हा मी त्यांना असे उत्तर देतो, असंही योगी म्हणाले होते. भाजपची सरकार आल्यानंतर अयोध्या आणि प्रयागराज असे नामकरण केल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रात भाजपची सरकार आल्यानंतर दिल्लीत औरंगजेब रोडचे नामकरण डॉ. अब्दुल कलाम मार्ग असं करण्यात आलंय. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष आकोल कुमार यांनी म्हटलं की, आम्हाला वाटते की, हैदराबादचे भाग्यनगर असे नामकरण झाले पाहिजे.

Congress | नागपूरचे छोटू भोयर प्रकरण दिल्लीत हायकमांडकडे; आपसातील वाद कसे मिटणार?

Polling | विदर्भातील नगरपंचायतीत 76.83, तर भंडारा-गोंदियात झेडपीत 66 टक्के मतदान, चर्चा आता कोण जिंकून येणार याची!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.