Video | पुण्यातील Phone Tapping प्रकरण, नाना पटोलेंनी ठोकला रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा

भाजपची सत्ता राज्यात असताना सहा राजकीय नेत्यांचे फोन टॅप (Phone Tapping Case) करण्यात आले होते. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही नाव होते. या प्रकरणी फोन टॅप करणाऱ्या पुण्याच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नाना पटोले यांनी मानहानीचा दावा नागपुरातील न्यायालयात दाखल केला.

Video | पुण्यातील Phone Tapping प्रकरण, नाना पटोलेंनी ठोकला रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटींचा मानहानीचा दावा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 2:24 PM

नागपूर : पुणे येथील 2017-18 मध्ये फोन टॅपिंग (Phone Tapping Case) करण्यात आले होते. त्यावेळी रश्मी शुक्ला या पुण्याच्या आयुक्त (Rashmi Shukla Pune Commissioner) होत्या. राज्य सरकरानं चौकशी समिती नेमली होती. ही चौकशी पूर्ण झाली. समितीने याचा अहवाल पुणे येथील गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांच्याकडे सोपविण्यात आला. चांदगुडे यांनी शुक्ला आणि इतरांविरोधात 25 फेब्रुवारी 2022 रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावेळी सहा राजकीय नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. या राजकीय नेत्यांचे फोननंबर वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केले गेले होते. अमजद खान या नावाने नाना पटोले (Congress State President Nana Patole) यांचा फोन टॅप करण्यात आला होता. हे सर्व करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब केला गेला नव्हता.

नाना पटोले यांचे ट्वीट

नाना पटोले यांचं म्हणण काय

यासंदर्भात नाना पटोले म्हणाले, फोन टॅपिंग प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सरकारनं आश्वासन दिलं की, आम्ही चौकशी करतो. चौकशीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे कारवाई करतो. सरकरानं संपूर्ण चौकशी केली. त्यावेळच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला ह्या त्याठिकाणी दोषी आढळल्या. त्यामुळं रश्मी शुक्ला यांच्या विरोधात आम्ही मानहानीचा दावा ठोकला आहे. हा दावा जवळपास 500 कोटी रुपयांचा आहे. या पद्धतीनं कुणाच्या व्यक्तिगत जीवनात जाऊन त्याला त्रास देणं. त्याला ब्लाकमेल करणं. ही पद्धत बंद व्हावी, या यामागचा उद्देश आहे. या सगळ्या षडयंत्राच्या मागे आणखी कोण-कोण आहे, ही स्पष्टता पुढं यावी.

नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा

या दाव्यामध्ये केंद्रीय गृह विभागाचे सचिव, राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त, नागपूर पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांचा दाव्यातील इतर प्रतिवादींमध्ये समावेश आहे. नाना पटोले यांच्याकडून अॅड. सतीश उके व अॅड. वैभव जगताप यांनी कामकाज पाहिले. नाना पटोले यांनी केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.

Video | आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानीतून हकालपट्टी? Raju Shetti म्हणतात, पक्षात सक्रिय नाही

Nagpur Railways | रेल्वेत आधी मैत्री करून drinks ऑफर करायचा, नंतर गुंगीचे औषध देऊन चोरी करायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Wardha Crime | कैदेतून सुटीवर आले नि पसार झाले, 14 वर्षांनंतर फरार दोन गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.