राष्ट्रीय वयोश्री योजनेचे नोंदणी शिबिर आजपासून, नागपूर शहरातील नागरिकांना कसा घेता येणार लाभ
राष्ट्रीय वयोश्री योजना नागपूर शहरात राबविण्यात येत आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये नोंदणी करण्यात येत आहे. यासाठी दहाही झोनमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजने (National Forest Scheme) अंतर्गत मनपातर्फे शहरातील ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen) व दिव्यांग (Disabled ) व्यक्तींना मदत पोहचविण्यात येत आहे. या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मनपाच्या दहाही झोनमध्ये वेगवेगळ्या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नोंदणी शिबिराची सुरुवात 27 फेब्रुवारीपासून लक्ष्मीनगर झोन अंतर्गत विवेकानंदनगर येथील बॅडमिंटन हॉल येथून सकाळी झाली. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह झोन कार्यालयात जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनातील सक्षम अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले चाळीस टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक. मासिक उत्पन्न पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. पूर्ण पत्ता असल्याचा दाखला/आधार कार्ड. दोन पासपोर्ट फोटो.
शिबिराची झोननिहाय माहिती
- लक्ष्मीनगर झोन – 27 व 27 फेब्रुवारी – बॅडमिंटन हॉल, विवेकानंद नगर – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत. धरमपेठ झोन – 1 व 2 मार्च – अग्रसेन भवन, रवीनगर – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.
- हनुमाननगर झोन – 3 व 4 मार्च – ईश्वर देशमुख महाविद्यालय सभागृह, क्रीडा चौक – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत गांधीबाग झोन – 5 व 6 मार्च – टाऊन हॉल, महाल – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.
- सतरंजीपुरा झोन – 7 व 8 मार्च – मुदलियार सभागृह, शांतीनगर – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत. लकडगंज झोन – 9 व 10 मार्च – कच्छी विसा, ओसवाल समाजभवन, एव्हीजी लेआऊट, लकडगंज – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.
- आशीनगर झोन – 11 व 12 मार्च – ललित कला भवन, ठवरे कॉलोनी, – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत. मंगळवारी झोन – 14 व 15 मार्च – स्वामी अय्यपा टेम्पल, श्याम लॉन जवळ, मानकापूर ते गोरेवाडा रिंग रोड – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.
- धंतोली झोन – 16 व 17 मार्च – राष्ट्रसंत तुकडोजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अग्याराम देवी चौक, गणेशपेठ – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत. नेहरूनगर झोन – 19 व 20 मार्च – राजीव गांधी सभागृह, नंदनवन – सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.