ओबीसी आरक्षणावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक! अध्यक्ष तायवाडे यांनी सांगितलं पुढील पाऊल काय असणार

जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी महासंघ आक्रमक होणार आहे. सोमवारी राज्यभर ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत. 23 मार्चला दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली.

ओबीसी आरक्षणावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक! अध्यक्ष तायवाडे यांनी सांगितलं पुढील पाऊल काय असणार
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीत बोलताना डॉ. बबनराव तायवाडेImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:15 PM

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देशातील ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण गेलंय. राजकीय आरक्षण गेल्याने राज्यातील ओबीसी समाजात नाराजी आहेत. यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झालीय. येत्या सोमवारी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आणि 23 मार्चला दिल्लीतील जंतर मंतरवर (Jantar Mantar in Delhi) देशभरातील ओबीसी नेते, कार्यकर्ते धरणे आंदोलन करणार, असा निर्णय राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या (National Federation of OBCs) बैठकीत घेण्यात आलाय. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना, आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा रद्द करावी, केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावं, या मागण्या असल्याचं यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे ( President Dr. Babanrao Taywade) यांनी सांगितलं.

जातीनिहाय जनगणना हाच अंतिम पर्याय

ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानं ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. या संदर्भात डॉ. बबनराव तायवाडे यांचा निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये ओबीसीच्या राजकीय आरक्षणबाबत तसेच ओबीसी वसतिगृह व इतर समस्यावर चर्चा झाली. ओबीसीचा लढा हा आत्मसन्मानाचा लढा आहे. सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीय आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला. त्यामुळं देशातील ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले आहे. यावर आता या देशातील सर्व जातीची जातीनिहाय जनगणना हाच अंतिम पर्याय आहे, यावर बैठकीत एकमत झालं.

ओबीसी महासंघाचे आवाहन

जातीनिहाय जनगणनेसाठी ओबीसी महासंघ आक्रमक होणार आहे. सोमवारी राज्यभर ओबीसी महासंघाचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहेत. 23 मार्चला दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आवाहन केले की, सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे. नेते मंडळींनी ओबीसी समाजाची दिशाभूल करणे टाळावे. देशातील ओबीसी बांधवांनी तमिळनाडू राज्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे. त्यांनी आपल्या राज्यात मिळविलेले बावन्न टक्के आरक्षण हा ओबीसी समाजासाठी आदर्श आहे.

ओबीसी संदर्भातील कायद्यावर सोमवारी चर्चेची शक्यता, विजय वडेट्टीवारांनी आणखी काय सांगितलं?

Video – खासदार रामदास तडस कुस्तीच्या आखाड्यात उतरतात तेव्हा… देवळीत खेळाडूंचा घेतला सराव!

एटीएममध्ये रोकड भरण्याचे होते काम, 15 लाख रुपयांचा अपहार! खामगावातले प्रकरण काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.