Navneet Rana : नागपुरात येताच नवनीत राणा, रवी राणांचा नारा बदलला, ‘जय हनुमान, जय संविधान’ची घोषणा
नागपुरात येताच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जोरदार घोषाबाजी केली. 'जय हनुमान, जय संविधान, जय श्रीरामच्या' घोषणांनी यावेळी त्यांनी नागपूर दणाणून सोडलं. माझ्या महाराष्ट्राला शनी लागला आहे तो दुर करण्यासाठी हनुमान चाळीसा पठण करत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी राणा यांनी दिली आहे.
नागपूर : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) आज बऱ्याच दिवसांनी दिल्लीतून नागपुरात दाखल झाले. हनुमाना चालीसा (Hanuman Chalisa) आणि त्यानंतर झालेलेली जेल, हा वाद दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. जेलमधून सुटल्यानंतर नवनीत राणा यांनी दिल्ली गाठत राज्य सरकार आणि पोलिसांनी संसदीय समिती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर हेच राणा दाम्पत्य संजय राऊत यांच्यासोबत लडाख दौराही करताना दिसून आलं. त्यानंतर आजा ते नागपुरात आले. यावेळी नागपुरात येताच नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जोरदार घोषाबाजी केली. ‘जय हनुमान, जय संविधान, जय श्रीरामच्या’ घोषणांनी यावेळी त्यांनी नागपूर दणाणून सोडलं. माझ्या महाराष्ट्राला शनी लागला आहे तो दुर करण्यासाठी हनुमान चाळीसा पठण करत आहोत, अशी प्रतिक्रिया यावेळी राणा यांनी दिली आहे.
रवी राणांचा नवा नारा
उद्धव ठाकरे राज्यावर आलेलं संकट
तसेच उद्धव ठाकरेंनी एकदातरी हनुमान चाळीसा म्हणावी, किमान दिखावा म्हणून तरी हनुमान चताळीसा म्हणावी, असा टोलाही राणा यांनी लगावला आहे. तसेच मुख्यमंत्री सत्तेचा गैरवापर करत आहेत.रामाचं आणि हनुमानचं नाव घेईल त्यांना जेलमध्ये टाकण्याचं एकसूत्री कार्यक्रम त्यांनी राबवला आहे. उद्धव ठाकरे रूपी संकट महाराष्ट्रवर आलेलं आहे, विदर्भात अडीचं वर्षात पाऊल ठेवलेलं नाही, असा आरोप रवी राणा यांनी यावेळी केला तर महाराष्ट्रातील हनुमान चाळीसेला विरोध का ? असा सवाल नवनीत राणा यांनी केला.
आजही पोलिसांनी आम्हाला अडवलं
तर यावेळी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, आद मंदिरात आम्ही दर्शनासाठी आलो आहे. आज खुप दिवसांनी आम्ही विदर्भात पाऊल ठेवले, मात्र आज सुध्दा पोलीसांनी आम्हाला आडवले होते. तरी आम्ही मंदीरात दर्शनासाठी आलो आहोत. आज मी हनुमानाला साकडे घातले, राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस यायला हवे, बोरोजगार तरूणाना रोजगार मिळावा, राज्याला लागलेला शणी लवकारत लवकर दूर व्हावा यासाठी मी आज प्राथणा केली, असेही त्या म्हणाल्या.
अमरावतीत राणा दाम्पत्या विरोधात शिवसेनेची बॅनरबाजी
हनुमान चालीसा प्रकरणा नंतर राणा दाम्पत्या हे आज 36 दिवसानंतर अमरावती जिल्हात येत आहे, त्यासाठी राणा दाम्पत्याचे स्वागत करण्यासाठी युवा स्वाभिमान समर्थक सज्ज झाले आहेत मात्र मात्र 36 दिवसात अमरावती जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं, विकास खुंटला असा आरोप अमरावतीच्या शिवसेना नेत्यांनी केला तर बेरोजगार, महागाई विरोधात राणा दाम्पत्य का बोलत नाही? असा सवाल राणा दाम्पत्याला शिवसेनेने विचारला तर अमरावतीत राणांच्या विरोधात शिवसेनेने बॅनरबाजी करत त्यांचा विरोध दर्शविला.