दहशतवाद्यांप्रमाणे नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर सुरु, खाकी वर्दीचं टेन्शन वाढलं

राज्याच्या पोलीस दलाची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण दहशतवाद्यांप्रमाणेच आता नक्षलवादीही समाजविघातक कृत्यांसाठी ड्रोनचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आलीय.

दहशतवाद्यांप्रमाणे नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर सुरु, खाकी वर्दीचं टेन्शन वाढलं
संदीप पाटील, पोलीस उप महानिरिक्षक, गडचिरोली परिक्षेत्र
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 8:16 AM

नागपूर : राज्याच्या पोलीस दलाची चिंता वाढवणारी ही बातमी आहे. कारण दहशतवाद्यांप्रमाणेच आता नक्षलवादीही समाजविघातक कृत्यांसाठी ड्रोनचा वापर करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आलीय. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मिरमध्ये घातपातासाठी ड्रोनचा वापर केला. आता नक्षलवाद्यांकडूनंही ड्रोनचा वापर होत असल्याची बाब, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील (Sandip Patil) यांनी मान्य केलीय. (Naxal Used drone camera For Post Surveillance)

नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर सुरु, पोलिसांसमोर नवं आव्हान

गडचिरोली आणि गोंदियाच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांकडून ड्रोनचा वापर सुरु झालाय. वर पहाडांवर बसून नक्षलवादी पोलीसांवर निगरानी आणि घातपातासाठी वापरतात ड्रोन वापरतात, पण जंगलात राहणाऱ्या नक्षलवाद्यांना ड्रोन नेमके कुणी पुरवले? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नागपूरसह, हैदराबादवरुन नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा होत असल्याची माहिती आहे.

नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध

नक्षलवाद्यांना ड्रोन पुरवठा करणाऱ्यांचा पोलीस घेत आहेत शोध आहेत. आपल्या पोलीसांकडेही ड्रोन आहे. त्यासोबतच नक्षलवाद्यांचे ड्रोन नष्ट करण्यासाठी पोलीसंही आता ॲंटीड्रोन खरेदी करणार आहे. तशी माहिती गडचीरोली परिक्षेत्र पोलीस उप महानिरिक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

ड्रोन… पोलिसांसमोरचं आव्हान?, काय म्हणाले पोलीस उप महानिरिक्षक संदीप पाटील?

नवीन तंत्रज्ञान आल्यानंतर सहाजिकच नवीन आव्हान असतात. आधी पोलीस ड्रोनचा वापर करायचे, आता नक्षलवादीदेखील ड्रोनचा वापर करू लागले आहेत. पोस्ट सर्व्हिलन्ससाठी नक्षलवादी ड्रोनचा वापर करत आहेत. काउंटर ड्रोन जे काही मेजरमेंट आहेत, त्याची एसओपी आपल्याकडे आहे त्यानुसार आपण नक्षलवाद्यांना उत्तर देण्यास सक्षम आहोत, अशी माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

गडचिरोली आणि गोंदिया च्या कुठल्या भागामध्ये नक्षलवाद्यांचा ड्रोनचा वापर?

सध्या नक्षलवादी ड्रोनचा वापर करतात तो फक्त पोस्ट सर्व्हिलन्ससाठी…. छत्तीसगड सीमेलगत किंवा मग बॉर्डरवर लागून असलेल्या पोस्टवर सर्वाधिक ड्रोनचा वापर नक्षलवादी करत असल्याचे लक्षात आलं आहे. आम्हीही ड्रोनचा वापर करतो की नक्षलवादी नेमके कुठल्या एरिया मध्ये लपून वगैरे बसलेला आहे, जेणेकरून आम्हाला ऑपरेशन प्लॅन करता येईल, अशी माहितीही संदीप पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

(Naxal Used drone camera For Post Surveillance)

हे ही वाचा :

शहीद सप्ताह सुरु, नक्षलवादी पुन्हा सक्रिय, नक्षलग्रस्त भागात नक्षल कारवायांची शक्यता

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.