काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्यास नागपुरात स्वबळावर, राष्ट्रवादीचा इशारा

काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्यास नागपुरातील सर्व जागा लढवू, असा इशारा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी दिला

काँग्रेसने सन्मानजनक जागा न दिल्यास नागपुरात स्वबळावर, राष्ट्रवादीचा इशारा
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 9:10 AM

नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणुकांसाठी वर्षभरापेक्षा जास्त कालावधी असला, तरीही सर्व पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्या नाही, तर नागपुरातील सर्व जागा स्वबळावर लढू, असा इशारा राष्ट्रवादीचे नागपूर शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी दिला. (NCP indicates at fighting solo in Nagpur Municipal Election warns Congress)

राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी नागपूर महापालिका निवडणुकीची जोरात तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख, खासदरा प्रफुल्ल पटेल यांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी आणि छोट्या बैठका सुरु केल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी सोमवारी दिवसभरात सहा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते, वेगवेगळ्या समाजातील प्रतिष्ठितांच्या भेटी घेतल्या.

राष्ट्रवादीचे दिग्गज मैदानात

“राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्या नाहीत, तर नागपुरातील सर्व जागा लढवू, स्वबळाच्या दिशेने तयारी सुरु आहे” अशी माहिती यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली. यासाठी अनिल देशमुख आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मैदानात उतरल्याचं अहिरकर यांनी सांगितलं.

भाजपला धक्का

नागपूर पदवीधर मतदारसंघात मोठा पराभव पत्करावा लागल्याने भाजपमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गडालाच महाविकास आघाडीने सुरुंग लावल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आगामी नागपूर महापालिका निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये आठवड्यातून दोन दिवस मुक्काम ठोकणार असून संघटनात्मक बांधणी आणि निवडणुकीच्या तयारीवर भर देणार आहेत.

“भाजप नेहमीच निवडणुकीच्या तयारीत असते, नागपूर मनपा पुन्हा जिंकणार आणि विधानसभा निवडणूक केव्हाही होवो, विदर्भातील 62 पैकी 50 पेक्षा जास्त जागा जिंकू” असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या :

फडणवीसांचा नागपुरात आठवड्यातून दोन दिवस मुक्काम; पालिका निवडणुकीची तयारी सुरू

भाजपचा बालेकिल्ला 55 वर्षांनी खालसा, नागपूर पदवीधर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा, अभिजीत वंजारी विजयी

(NCP indicates at fighting solo in Nagpur Municipal Election warns Congress)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.