ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता हे त्रिवार सत्य; अजित पवार यांचा उदाहरणे देऊन दावा

शेतकरी, विदर्भाचे प्रश्न आहेत. पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. वीज तोडणी सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत टोकाची भूमिका घेत आहेत.

ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता हे त्रिवार सत्य; अजित पवार यांचा उदाहरणे देऊन दावा
ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता हे त्रिवार सत्य; अजित पवार यांचा उदाहरणे देऊन दावाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 9:19 AM

नागपूर: तुमच्या नाकाखालून खेचून सरकार नेलं, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं होतं. फडणवीस यांच्या या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. ठाकरे सरकार पाडण्याचा भाजपचा सुरुवातीपासूनच प्रयत्न होता. ठाकरे सरकार पाडण्यात भाजपचाच हात होता. हे त्रिवार सत्य आहे, असा दावाच अजित पवार यांनी केला. यावेळी त्यांनी सरकार पाडण्यात भाजपचा हात कसा होता याचे उदाहरणेच सांगितली.

सरकार पाडण्यात आमचा काही संबंध नाही. आम्ही नामानिराळे आहोत, असं भाजपकडून सुरुवातीला सांगितलं जात होतं. नंतर 15 -16 आमदार निघून गेले. आता अलिकडे भाजपमधील काही लोकांची वक्तव्ये आली आहेत. मीच आमदारांना गुवाहाटीला जाण्यासाठी फोन केले होते, असं काही जण म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तर काहींच्या कुटुंबातील लोकांनी ते वेषभूषा करून कसे जायचे हे सांगितलं. फोन करून मी पाठवलं, वेशभूषा बदलून जात होते, बदला घेतला हे कोणी म्हटलं? हे सर्वांना माहीत आहे. याचा अर्थ सुरुवातीपासूनच ते सरकार पाडण्याच्या तयारीत होते. हे त्रिवार सत्य आहे, असं अजित पवार म्हणाले.

त्यांच्या हाताला एकनाथराव शिंदे लागले. एक गट लागला. त्यामुळे त्यांना सरकार बदलवता आलं. पण 15-16 आमदारांच्या निलंबनाचं प्रकरण कोर्टात आहे. त्याच्या तारखावर तारखा पडत आहेत. तो निकाल लागल्यावर काय ते चित्र स्पष्ट होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संख्येवरही बोलण्यास त्यांनी नकार दिला. हा सगळा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. मंत्रिमंडळ किती संख्येचं असावं नसावं हा त्यांचा विषय आहे. फक्त जनतेची कामे झाली पाहिजे. आम्हाला मंत्रिमंडळात स्वारस्य नाही, असं अजितदादांनी सांगितलं.

शेतकरी, विदर्भाचे प्रश्न आहेत. पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. वीज तोडणी सुरू आहे. शेतकरी आत्महत्या करण्यापर्यंत टोकाची भूमिका घेत आहेत. हे चित्रं महाराष्ट्राला शोभनीय नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. त्यावर काही ठोस घडत नाही.

प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. काही लाख कोटींची गुंतवणूक होणार होती. काही लाख नोकऱ्या मिळणार होत्या. ही गुंतवणूक का झाली नाही? याचं उत्तर मिळत नाही. सीमावादाचा प्रश्न कधीच एवढा चिघळला नव्हता. आताच का चिघळला? याचं उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मी सुरुवातीपासून नागपूरमध्ये होताना तीन आठवड्याचं करण्यात आलं. दोन वर्ष कोरोनामुळे अधिवेशन झालं नाही. कारण नसताना गैरसमज होतात. इथल्या लोकांना मुद्दाम अधिवेशन घेत नाही. कारण नसताना चुकीची भावना त्यांच्या मनात येते.

काल मी पत्रकार परिषद घेतली. त्यातही तोच आग्रह धरला होता. अधिवेशन जास्त काळ चाललं तर अनेक प्रश्न चर्चेला येतात. राज्य सरकारची भूमिका कळते. त्यातून उत्तरे देतात. राज्यकर्ते उत्तरांना बांधिल असते.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.