आज सरकार असूनसुद्धा ‘या’ आमदारांना हॉटेल शोधावं लागतंय, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याने गुवाहाटी दौऱ्याची करून दिली आठवण
हे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेली ही भूमी आहे. ती जरी या नेत्यांनी समजून घेतली तरी खूप झाले असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
नागपूरः गेल्या सहा महिन्यापूर्वी काय हॉटेल, काय झाडी, काय डोंगार असं म्हणणाऱ्या सरकारमधील नेत्यांनाच आता नागपूरात हॉटेल शोधावं लागतं हेच दुर्देवी आहे अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिठकरी यांनी केली. आमदार शहाजी बापू पाटील यांचे नाव न घेता, गुवाहाटी दौऱ्यावर असताना त्यांची व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपची आठवण करून देत त्यांनी सरकारमधीलच नेत्यांवर बोचरी टीका केली आहे. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येण्याआधी बंडखोर आमदारांनी मुंबई-सूरत-गुवाहाटी असा दौरा केला होता. त्या दौऱ्यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.
त्या क्लिपचा संदर्भ देत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिठकरी यांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असतानाही सरकारमधील नेत्यांना हॉटेल शोधावी लागत आहेत. ही दुर्देवी गोष्ट असल्याची टीका त्यांमनी शहाजी बापू यांच्यावर केली.
सहा महिन्यापूर्वी सरकारमधील काही आमदार काय झाडी, काय हॉटेल करत होते मात्र आता ऐन हिवाळी अधिवेशनावेळी त्यांना हॉटेल शोधावी लागत आहेत अशी बोचरी टीकाही त्यांच्यावर त्यांनी केली आहे.
आमदार शहाजी बापू पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर अमोल मिठकरी यांनी टीका केली आहे. आज नागपूरात ताज किंवा गुवाहाटीसारखी हॉटेल नाहीत.
मात्र हे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेली ही भूमी आहे. ती जरी या नेत्यांनी समजून घेतली तरी खूप झाले असा खोचक टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.
अमोल मिठकरी यांनी सरकारमधील आमदारांवर टीका करताना हा काळाचा महिमा असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे सरकारमधीलच आमदारांना हॉटेल मिळाले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.