“सरकारच्या या धोरणामुळे कापसाचे भाव पडल्याने शेतकरी संकटात”; बळीराजाच्या समस्यांना या नेत्याने सरकारलाच जबाबदार धरले
राज्य सरकारने लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
नागपूर : राज्यात आणि केंद्रात असलेल्या सरकारमुळेच देशासह राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यावर्षी राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारकडून नुकसानीचे पंचनामे झाले, मात्र अजूनही शेतकऱ्यांना आर्थक मदत मिळाली नाही. कांदा, टोमॅटो, भाजी उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उभा पिकांवर ट्रॅक्टर आणि उभा पिकात जनावरे सोडली होती. त्यामुळेच आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यातील कापूस उत्पादकही आता आर्थिक संकटात सापडला आहे. त्यावरूनच माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी बोलताना त्यांनी या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे असा घणागातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या आयात-निर्यात धोरणामुळे कापसाचे भाव पडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
राज्य सरकारने लक्ष द्यावे आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल यासाठी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
ते नागपुरमध्ये प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अनिल देशमुख यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या मागण्यांचीही माहितीही यावेळी देण्यात आली.
तसेच येत्या 3 आणि 4 जूनला नागपुरात राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. यासाठी 3 रोजी उद्घाटन समारंभात अजितदादा पवार उपस्थित राहणरा आहेत. तर 4 जून रोजी समारोपाला राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. दोन दिवस सुमारे पाचशे ते सहाशे कार्यकर्ते या ओबीसी शिबिरात सहभाग घेणार असून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहितीही राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.