‘बोम्मईमुळं तुमचे कपडे उतरत आहेत’; राष्ट्रवादीच्या नेत्याने सरकारले फटकारले…
आमच्या सरकारने त्यांना जाब विचारायच्या ऐवजी, यांनी त्यांना म्हणायाल पाहिजे होते, तुम्ही माफी मागा आणि विषय संपवून टाका पण आपले सरकार तसे करताना दिसून येत नाही असा टोलाही त्यांना लगावला आहे.
नागपूरः हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधीच सीमावाद आणि बेताल वक्तव्यावरून हे अधिवेशन गाजणार असल्याची चिन्हं दिसून येत होती. हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावरून जोरदार निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये बसवराज बोम्मई यांनी आपले ट्विटर हँडल हॅक झाले होते असे सांगितले होते.
त्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना, ‘बोम्मई हा खोटारडा माणूस असून ट्विट केल्यानंतरही जर ही गोष्ट त्यांना 15 दिवसांनी माहिती होत असेल तर मोठी आणि गंभीर गोष्ट आहे. मात्र यावरून बोम्मईंचा खोटारडे पणा दिसून येत आहे. ते खोटं बोलत आहेत.
त्यांचे कपडे सांभाळायला आमचे मंत्री जात आहेत मात्र त्यांचे कपड सांभाळताता तुमचे कपडे उतरत आहेत’ असा जोरदार हल्लाबोल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या ट्विटमुळे आमच्या राज्यातील माणसांची वाहनं फुटली, मराठी माणसांनी मार खाल्ला, त्यांचा अपमान झाला तरीही आम्ही शांत राहिलो.
आणि हा बोम्मई दिल्लीत येऊन खोटं सांगतो की, मी ट्विट केलं नाही. हा निव्वळ खोटारडे पणा असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोम्मई यांच्या ट्विटवरून राज्य सरकारवर निशाणा साधताना म्हणाले की, बेळगावमधील मराठी माणसांनी मार खाल्ला, त्यांचा अपमान झाला आहे तरीही मराठी माणूस म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही का असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे.
आमच्या सरकारने त्यांना जाब विचारायच्या ऐवजी, यांनी त्यांना म्हणायाल पाहिजे होते, तुम्ही माफी मागा आणि विषय संपवून टाका पण आपले सरकार तसे करताना दिसून येत नाही असा टोलाही त्यांना लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधता साधता त्यांनी केंद्रावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी देशात महागाई, चीन आणि बेरोजगारी याविषयावर भारतात बोलायचं नाही.
आणि बोलला तर सत्ताधीश भाजपवाले पठाण, भगवा, निळा या रंगांचं राजकारण करून लोकांना वळवायचं कसं ते त्यांना चांगलं माहिती आहे असा टोलाही त्यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.