केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करते हा काय प्रश्न आहे का?, लढलेंगे इससे भी; सुप्रिया सुळे आक्रमक
केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करत आहे का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर हा काय प्रश्न आहे का? असा उलट सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. (NCP MP Supriya Sule Criticises bjp over ED action)

नागपूर: केंद्र सरकार ईडीचा दुरुपयोग करत आहे का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर हा काय प्रश्न आहे का? असा उलट सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच लढलेंगे इससे भी, असं सूचक विधानही त्यांनी केलं. (NCP MP Supriya Sule Criticises bjp over ED action)
राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीसाठी सुप्रिया सुळे आज नागपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ईडीच्या कारवायांवरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. माझ्या आयुष्यात सत्तेचा दुरुपयोग मी पहिल्यांदा बघितला. विरोधात बोललं की पाठव ईडीची नोटीस असा प्रकार सध्या सुरू आहे. पण हरकत नाही. लढलेंगे इससेभी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पवार लवकरच राज्याच्या दौऱ्यावर
पुढच्या काही दिवसांत शरद पवार राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहेत. नियम पाळून पवार दौरा करणार आहेत. ते घरात कमी आणि दौऱ्यावर जास्त असतात, असं त्यांनी सांगितलं. तसेच अर्बन प्लानिॅगमध्ये आपण फेल ठरलो. त्यामुळे यात आता लक्ष देणं गरजेचं आहे, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
राणेप्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. त्यावर त्यांना विचारलं असता राज्यात रोजगार, कोव्हिड, महिलांच्या प्रश्नांसह एवढे मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे मला नारायण राणे यांच्या प्रकरणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
भाजपमध्येच मतभेद
ओबीसी आरक्षण बैठकीनंतर भाजपने टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाही सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला. कालच्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्याला सर्व पक्षीयांनी पाठिाबा दिला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारच्या भूमिकेचं स्वागत केलं. पण चंद्रशेखर बावनकुळे यांनी वेगळा सूर आळवला. त्यामुळे भाजपमध्येच मतभेद असल्याचं दिसून येत आहे, असा टोला त्यांनी लगावला.
केंद्राने राज्याला मदत करावी
शेतकऱ्यांच्या कृषी पंपाच्या वीज बिलाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. पाऊस कमी पडलेल्या 13 जिल्ह्यांबाबत वेगळा निर्णय होणार आहे, असं सांगतानाच महाराष्ट्र सरकारची जी परिस्थिती भाजप सरकारने करुन ठेवली होती, त्यामुळे अजित पवारांवर जबाबदारी आली आहे. केंद्रात खासदारांना विकास निधी मिळत नाही, पण महाराष्ट्रात आमदाराच्या निधीला कट लावला नाही. केंद्र सरकारने माणुसकीच्या नात्याने आज महाराष्ट्राला मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
अनाथ मुलांसाठी ‘राष्ट्रवादी जीवलग’
राज्यात कोरोनामुळे 450 पेक्षा जास्त मुलं अनाथ झाली आहेत. अनाथ झालेल्या अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा घाट घातला जातो. पण आम्ही ते होऊ देणार नाही. यासाठी ‘राष्ट्रवादी जीवलग’ काम करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. (NCP MP Supriya Sule Criticises bjp over ED action)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 28 August 2021 https://t.co/ebUFLc3PtW #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 28, 2021
संबंधित बातम्या:
‘काही जित्राबं लय वाईट असतात’, अजित पवारांच्या सडेतोडपणाचे 8 पुरावे, वाचा सविस्तर
प्रेम एकीवर केलं, लग्न दुसरीसोबतच, पहिलीनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं, आता जगण्यासाठी संघर्ष
(NCP MP Supriya Sule Criticises bjp over ED action)