Vedio छोटू भोयर यांना भोवणार राष्ट्रवादी, शिवसेनेची नाराजी?, राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची वरिष्ठांच्या आदेशाकडे नजर

छोटू भोयर यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधला नाही. नागपूर जिल्ह्यात काँग्रेस आम्हाला दुय्यम वागणूक देतात, असं म्हणत बाबा गुजर यांनी नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत आम्ही विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेससोबत नाही, असा सूरही गुजर यांनी आळवला.

Vedio छोटू भोयर यांना भोवणार राष्ट्रवादी, शिवसेनेची नाराजी?, राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची वरिष्ठांच्या आदेशाकडे नजर
बाबा गुजर
Follow us
| Updated on: Nov 24, 2021 | 2:39 PM

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत नाराजीनाट्य दिसून येतेय. काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांचा उमेदवारी अर्ज भरताना राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भात राष्ट्रवादीचं दुकानं बंद करण्याची भाषा करतात. उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसने आम्हाला बोलावलं नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर यांनी केलाय.

छोटू भोयर यांचा उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेसने राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधला नाही. नागपूर जिल्ह्यात काँग्रेस आम्हाला दुय्यम वागणूक देतात, असं म्हणत बाबा गुजर यांनी नाराजी व्यक्त केली. वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत आम्ही विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेससोबत नाही, असा सूरही गुजर यांनी आळवला.

वरिष्ठांना कळविण्यात आले नव्हते

छोटू भोयर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा राष्ट्रवादीचा कोणताही मोठा नेता तिथं नव्हता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे हेविवेट नेते प्रफुल्ल पटेल, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. वेळेवर कुणी सांगत असेल, तर कशी हजेरी लावायची, असं बाबा गुजर म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाला काँग्रेस नेहमीच दुय्यम वागणूक देते. राष्ट्रवादीला कमी लेखले जाते. त्यामुळं सध्या प्रफुल्ल पटेल जे आदेश देतील, त्यानुसार पुढं काम करणार असल्याचं बाबा गुजर म्हणाले.

दुकान बंद करण्याची भाषा बरी नव्हे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राष्ट्रवादीचे दुकान बंद करायची भाषा करतात. ते वेगळं दुकान करत असतील, तर आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल. विदर्भात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले असता त्यांनीही नाना पटोलेंच्या वक्तव्याचा निषेध केला होता. पक्षाच्या अध्यक्षाला असं बोलणं शोभत नाही, असं ते म्हणाले होते.

Nagpur -मतदार पळवापळवीची भीती, विधान परिषद निवडणूक, नगरसेवकांवर ठेवणार पाळत

34 वर्षांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये, नागपूर विधानपरिषदेसाठी बावनकुळेंविरोधात छोटू भोयर

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.