नवीन निवासी इमारती बांधताय, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा केलीत काय?, सरकारी जीआर काय सांगतो…

नवीन निवासी इमारत बांधत असाल, तर इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे. राज्य सरकारनं तसा जीआर काढलाय. या जीआरची अंमलबजावणी नागपूर शहरातही सुरू झालीय.

नवीन निवासी इमारती बांधताय, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा केलीत काय?, सरकारी जीआर काय सांगतो...
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 4:00 AM

नागपूर : महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण (Maharashtra Electric Vehicle Policy) 2021 ची अंमलबजावणी नागपूर शहरात सुरू करण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (Nagpur Metropolitan Region Development Authority) याकडं लक्ष दिलंय. आता नवीन निवासी इमारतींना त्याच्या एकूण पार्किंग जागेपैकी किमान वीस टक्के जागा इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधेसाठी राखीव ठेवणे बंधनकारक असेल. यापैकी तीस टक्के ही सामायिक पार्किंग जागा असेल. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागानं जुलै 2021 ला एक जीआर काढला. त्यानुसार, राज्यात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण राबविण्यात येईल. एक फेब्रुवारी 2022 पासून नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविताना महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणातील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. नवीन निवासी प्रकल्प विकासकांना एक फेब्रुवारी 2022 पासून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग (Electric vehicle charging) सुविधेसाठी सुसज्ज पार्किंग खरेदीचा पर्याय देणे आवश्यक असणार आहे.

पंचेवीस टक्के जागा राखीव

सार्वजनिक पार्किंग प्लाझा त्यांच्या एकूण क्षमतेच्या किमान पंचेवीस टक्के जागा, 2023 पर्यंत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधेसाठी सुसज्ज जागामध्ये रूपांतरित करावे लागणार आहेत. सर्व संस्थात्मक आणि व्यावसायिक संकुल 2023 पर्यंत त्यांच्या एकूण पार्किंग जागांपैकी पंचेवीस टक्के जागा इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधेसाठी सुसज्ज जागामध्ये रूपांतरित करावी लागणार आहे. सर्व शासकीय कार्यालये 2025 च्या आधी त्यांच्या एकूण पार्किंग जागांपैकी शंभर टक्के इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधेसाठी सुसज्ज पार्किंगमध्ये रूपांतरित करतील. शासनाच्या आदेशाप्रमाणे नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे देण्यात आले आहेत. इमारत बांधकामाचे नियोजन करताना वरील तरतुदी करून इमारत नकाशे मंजुरीसाठी सादर करावे लागले. तसेच तरतुदींचे पालन करण्याचे आवाहन मनोजकुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.

Nagpur Crime : पगार न देणाऱ्या मालकाच्या घरी नोकराने केली चोरी; नागपुरात अल्पवयीन मुलाने असा घेतला बदला

नागपूर पोलीस हिंदुस्थानी भाऊला बजावणार नोटीस; आयुक्त म्हणतात, सहभागी विद्यार्थ्यांचाही शोध घेणार

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक; अंजनगाव सुर्जीत उंच टॉवरवर विरूगिरी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.