जिल्ह्याच्या सीमा बंद, नियम मोडणाऱ्यांना 14 दिवस डांबून ठेवणार, तिसऱ्या लाटेसाठी नागपूर रोल मॉडेल ठरणार ?
कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी नियम मोडलेल्या रिकामटेकड्या लोकांना तब्बल 14 दिवस न सोडण्याचे आदेश दिले आहेत. (ngapur third corona wave)
नागपूर : करोनाची दुसरी लाट संपलेली नसतानाच तिसरी लाट(Third Corona Wave) अटळ असून त्यासाठी तयार राहण्याचे आरोग्यविषयक तज्ज्ञ सल्ला देत आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी नागपूरमध्ये मेगा प्लॅन तयार करण्यात आलाय. नागपूर जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. तसचे कोरोनाची दुसरी लाट परतवून लावण्यासाठी नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut ) यांनी नियम मोडलेल्या रिकामटेकड्या लोकांना तब्बल 14 दिवस न सोडण्याचे आदेश दिले आहेत. (Ngapur guardian minister Nitin Raut said be prepared for third Corona wave ordered doctor to follow all instruction)
जिल्ह्याच्या सीमा बंद
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सर्वात अधीक झळ नागपूर शहर आणि जिल्ह्याला बसली आहे. येथे रोज हजारो रुग्ण नव्याने आढळत आहेत. तर दुसरीकडे मृतांचे प्रमाणसुद्दा बरेच आहे. कोरोनाची दुसरी लाट अजूनही परतलेली नाही. तसेच कोरोना रुग्णांवर म्हणावे तेवढे नियंत्रण मिळवता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाने तसेच नितीन राऊत यांनी मोठे निर्णय घेतले आहे. या निर्णयानुसार नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण सीमा बंद करण्यात आलायत. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी पकडलेल्या रिकामटेकड्यांना तब्बल 14 दिवस सोडू नये अस राऊत यांनी सांगितलेय.
जिल्ह्यात 25 ऑक्सिजनचे प्लाटं उभारण्याचे नियोजन
तसेच नागपूर येथील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मानकापूर येथे नऊशे खाटांचे जम्बो कोविड हॉस्पिटल लवकर पूर्ण करण्याचे राऊत यांनी निर्देश दिले आहेत. जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये म्हणून एकूण 25 ऑक्सिजन प्लांट उभे करण्याचं नियोजन करण्यात आलंय. नागपूर जिल्ह्यात एकूण दहा ठिकाणी क्रायोजनिक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून तब्बल 5 हजार जंबो सिलिंडर उपलब्ध केले जातील.
दररोज 10 हजार चाचण्या पूर्ण करण्याचं नियोजन
जेवढ्या जास्त कोरोना चाचण्या केल्या, तेवढे लवकर कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढवण्यात येणार आहे. या अंतर्गंत दररोज तब्बल 10 हजार चाचण्या पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी 1 हजार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील कोविड सेंटर सर्व सोयी सुविधांनी सक्षम बनवण्यात येणार आहे.
दरम्यान, कोरोनाची सध्याची दुसरी लाट आणि आगामी तिसरी लाट पाहता कठोर खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करणआऱ्या डॉक्टरांनी उपचाराचे नियम न पाळल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच लसीकरण वाढविण्यासाठी आता अधिकार्यांची टीम गावांची भेट घेणार आहे. नागपूर प्रशासनाच्या या तयारीमुळे कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
इतर बातम्या :
पंढरपुरात निवडणुकीमुळे कोरोनाचा उद्रेक, ड्युरीवरील शिक्षकासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
कोरोनावरील आणखी एका औषधाला मंजुरी, DRDO नं बनवलेलं औषध ऑक्सिजनची आवश्यकता कमी करणार
(Ngapur guardian minister Nitin Raut said be prepared for third Corona wave ordered doctor to follow all instruction)