Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही, त्यामुळेच… नितीन गडकरी यांचा पुढाऱ्यांना वऱ्हाडी झणका

Nitin Gadkari on Politicians : नितीन गडकरी हे रोखठोक बोलतात. विधानसभेपूर्वी ते राज्याच्या राजकारणात सक्रियपणे दिसतील. त्यापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी पुढाऱ्यांचे कान टोचले. राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यांचा वऱ्हाडी ठेचा झोंबणार आहे.

Nitin Gadkari : राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही, त्यामुळेच... नितीन गडकरी यांचा पुढाऱ्यांना वऱ्हाडी झणका
नितीन गडकरी यांनी असे टोचले कान
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 9:06 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रोकठोक बोलतात. अनेक विषयांवर त्यांचे थेट बोलणे व्यवस्थेच्या चिंधड्या उडवतात. तर काही वेळा त्यांचा वऱ्हाडी ठेचा झोंबतो. कधी कधी चिमटे हस्याची खसखस पिकवतात. पण एकूणच गडकरी बोलले की राजकारण्यांसह अभ्यासकांचे कान टवकारतात. आता त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले आहे. त्यांनी राजकारण्यांचे अनेक कान धरले आहे. तर त्याचवेळी चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना फटकारे सुद्धा लगावले आहेत. काम केल्यानंतर कोणालाच कळल नाही पाहिजे, पण आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे आहे असे म्हणत टोला हाणला.

राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही

राजकारणी जसे बोलतो तसे करत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षात राजकीय नेत्यांबद्दलची विश्वसनीयता कमी होत चालली आहे. लोकांना मूर्ख बनविणे सोपे आहे अस वाटतं. काही तर समाजाला अनेक प्रकारे तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे असेही म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक राजकारण्यांचे कान टोचले.ते नागपुरातील सुरेश भट सभागृहात अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

हे सुद्धा वाचा

जातपात पाळत नाही

लोकसभा निवडणुकीच्यावेळी प्रचार बोललो, जातपात पाळत नाही. मला वोट द्या किंवा नका देऊ. जो म्हणणार जात त्याला बसणार लात असंही बोललो. चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिला. समाजात अज्ञान अंधश्रद्धा, असमानता, स्त्री पुरुष विषमता हा भेद संपला पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण जनतेच प्रबोधन केलं पाहिजे, असे नितीन गडकरी म्हणाले.

कार्यकर्त्यांना असे फटकारले

पैसा हे साधन आहे पण साध्य नाहीये. माझा निवडणुकीमध्ये कोणीतरी गाणे तयार केले. ते गाणे युट्युब वर टाकले. ते गाणे 90 लाख लोकांनी ऐकले. त्या गाण्यापोटी रॉयल्टी म्हणून 85 हजार रुपये मला आणून दिले. चांगलं काम करा, आशीर्वाद पाठीशी आहे. काम केल्यानंतर कोणालाच कळल नाही पाहिजे, पण आजकाल 10 रुपये देऊन चौकात 10 फोटो लावणारे आहे असे म्हणत टोला हाणला.

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.