उन्हाळ्यात नागपूरकरांचा प्रवास गारेगार होणार; कसा तो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं

महानगरपालिकेच्या बस ताफ्यात आता 40 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात. या बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं.

उन्हाळ्यात नागपूरकरांचा प्रवास गारेगार होणार; कसा तो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
Follow us
| Updated on: Mar 20, 2023 | 8:18 AM

नागपूर : महानगरपालिकेच्या बस ताफ्यात आता 40 इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यात. या बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. नागपूरच्या ताफ्यामध्ये आणखी काही बस सहभागी होतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. यामुळे नागपूरकरांची प्रवास गारेगार होणार आहे. बसच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, सुंदर इलेक्ट्रिक बसचं उद्घाटन आता होते आहे. आज आम्ही मेट्रोची राईड केली. त्याचप्रमाणे आता नागपूरच्या इलेक्ट्रिक बसमध्ये राईड करणार आहोत.

२५० इलेक्ट्रिक बस देणार

फडणवीस म्हणाले, इलेक्ट्रिक बस सगळ्यात जास्त पीएमपीएलमध्ये आहे. मात्र आता तुम्हाला मी 250 इलेक्ट्रिक बस देणार. मात्र त्यासाठी बस स्टॉप चांगले करा. बस किती वेळात येणार हे जनतेला कळलं तर लोक या बस आणि मेट्रोने प्रवास करतील. एसी बसेस येणार असल्याने नागपूरकरांचा प्रवास उन्हाळ्यात गारेगार होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मेट्रो, बससाठी एकच कार्ड

यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितलं की, शहर बससेवेमध्ये इलेक्ट्रिक बस सुरू झाल्याने लोकांना आराम मिळणार आहे. सोबतच शहरातील प्रदूषणसुद्धा कमी होणार आहे. दिव्यांगांसाठी बसमध्ये चढण्यासाठी वेगळी सुविधा करावे. मेट्रो आणि बस करीत फक्त एकच कार्ड आता राहणार आहे. त्यामुळे तिकीट काढावी लागणार नाही. यातून तिकिटाचे पैसे कोणाला मारता येणार नाही. डिझेलचासुद्धा प्रश्न राहणार नाही.

ही नव्या युगाची सुरवात

महापालिकेची 15 वर्षे जुनी वाहने आता स्क्रॅपिंगमध्ये काढा. नागपूरसाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप काही दिलं आहे. लॉजीस्टिक पार्कची योजना तयार करून फडणवीस यांना देणार आहे. अत्याधुनिक बस स्टँड बनविण्याची योजना आहे. त्यासाठी केंद्रसुद्धा काही निधी देते. इलेक्ट्रिक बसची सुरवात ही नव्या युगाची सुरवात आहे. यामुळे प्रदूषण कमी होईल. एक हायट्रोजनवर चालणारी बस महापालिकेकडे यावी, अशी मी अपेक्षा करतो. ती बस मीच घेऊन येईन, असं आश्वासन नितीन गडकरी यांनी दिलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.