नितीन गडकरी यांनी टाटा समूहाला लिहिलेलं पत्र, टाटा समूहाला काय केली होती विनंती?
ऑनलाईन मार्केटिंग कंपन्यांचे गोदाम आणि वितरण व्यवस्था नागपुरात सुरू होत आहे.
नागपूर : नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षांना पत्र लिहीलं होतं. टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांना गडकरी यांनी पत्र लिहीलं होतं. “हा प्रकल्प नागपूर परिसरात टाटा समूहाच्या विस्तारित योजनांसाठी फायद्याचं ठरेल, असं पत्रात नमुद केलं होतं. नागपूर टाटा समूहाचं हब बनवण्याची गडकरी यांनी विनंती केली होती.
नितीन गडकरी यांनी नटराजन चंद्रशेखरन यांना लिहिलेल्या पत्रानुसार, विदर्भ आर्थिक विकास परिषदेच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील मिहानमध्ये टाटा गृपसाठी चांगल्या संधी आहेत. टाटा गृपला त्यांचा व्यवसाय विस्तारन्यासाठी मिहानमध्ये योग्य त्या सुविधा आहेत. विशेष आर्थिक क्षेत्रात सुमारे तीन हजार एकर जमीन उपलब्ध आहे. देशातील महत्त्वाच्या कंपनी येथे येत आहेत. हाउसिंग, लॉजिस्टिक, देशातल्या तसेच विदेशी कंपन्याही येथे येत आहेत.
ऑनलाईन मार्केटिंग कंपन्यांचे गोदाम आणि वितरण व्यवस्था नागपुरात सुरू होत आहे. एअर इंडिया, विस्तारा आणि एअर आशिया खर्च कमी करण्यासाठी रात्री पार्किंग करण्याची शक्यता आहे.
टाटा गृपच्या टाटा स्टील, टाटा मोटार्स, टाटा कंझुमर प्राडक्ट लिमिटेड, वोल्टास लिमिटेड, टायटन इंडस्ट्री, बीग बाजार लिमिटेड या कंपन्याही सहा राज्यातल्या 350 जिल्ह्यांमध्ये कनेक्ट राहू इच्छित आहेत. या भागात चांगल्या प्रकारे रस्त्याच्या सुविधा आहेत. मनुष्यबळ उपलब्धता आहे, असंही नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.
7 ऑक्टोबरला नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षांना पत्र पाठविलं होतं. नागपूरला हब बनविण्याची विनंती टाटा समूहाला नितीन गडकरी यांनी केली होती.