वीज कर्मचाऱ्यांचं पुण्यात आंदोलन, मेस्माविरोधात एकजूट; संप नको चर्चेतून तोडगा काढू : नितीन राऊत
देशातील वीज कंपन्यांचे (Electricity Worker) कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत. खासगीकरणाच्या (Privatization) विरोधात देशव्यापी संपाचं आयोजन करण्यात आलं आहे.
नागपूर: देशातील वीज कंपन्यांचे (Electricity Worker) कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत. खासगीकरणाच्या (Privatization) विरोधात देशव्यापी संपाचं आयोजन करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे चर्चेतून मार्ग काढू, असं नितीन राऊत (Nitin Raut) यांनी म्हटलं आहे. ज्या संघटना या संपात उतरल्या आहेत त्यांनी चर्चेतून तोडगा काढला पाहिजे. आम्ही खासगीकरणाविरोधात आहोत. शेतीचा हंगाम आहे, दहावी, बारावी च्या परीक्षा आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत.मात्र, संप घडवून खासगीकरणाचा डाव आखत असेल तर आम्ही कारवाई करू, असं नितीन राऊत म्हणालेत. तर, महापारेषणच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर वीज कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत देशव्यापी संपात सहभाग घेतला आहे.
चर्चेतून मार्ग निघेल
आम्ही चर्चेला तयार आहोत. आर्थिक संकटात असताना यावर मात करत आम्ही पुढं जात आहोत. कोरोना काळात वीज कर्मचाऱ्यांनी समोर येऊन सेवा केली हे मान्य आहे. आज वीज कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत VC च्या माध्यमातून चर्चा करत आहोत, तोडगा निघेल असं वाटत असल्याचं नितीन राऊत म्हणाले. मात्र कुणी असं समजू नये की आम्ही संप करू तरीही आम्हाला कुणी अडवणार नाही. सरकार कठोर होईल, मेस्मा अंतर्गत कारवाई करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
पुण्यात मेस्मा विरोधात कर्मचारी एकवटले
पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कार्यालयाच्या समोर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं. मेस्मा कायद्याच्या विरोधात कर्मचारी एकवटले आहेत. तर, भांडवलदारांच्या वीज क्षेत्रात मुक्त प्रवेश करणाऱ्या धोरणाच्या विरोधात देशव्यापी संपाचं आयोजन करण्यात आलं आहे.
वीज कर्मचाऱ्यांना मेस्मा लागू
राज्य सरकारच्या उद्योग आणि ऊर्जा विभागाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या राजपत्रात नमूद केल्याप्रमाणं महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्या विद्युत पारेषण कंपनी मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून मेस्मा लावण्यात आला आहे.
इतर बातम्या:
अखेर मुंबईतील मत्स्यालयाचा मार्ग मोकळा, दुग्धशाळा आरे वसाहतीमध्ये होणार स्थलांतरीत!