नाशिकमध्ये डेल्टा प्लसचे मोठ्या प्रमाणात रुग्ण, नितीन राऊतांचा नागपूरकरांना ‘हा’ इशारा

नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात डेल्टाप्लसचे रुग्ण आढळले आहेत. ते कधीही नागपूर पर्यंत पोहचू शकतं त्यामुळे त्यामुळं तिसरी लाट सुरू झालीय खबरदारी घेण्याची गरज असल्याचं नितीन राऊत म्हणाले आहेत.

नाशिकमध्ये डेल्टा प्लसचे  मोठ्या प्रमाणात रुग्ण, नितीन राऊतांचा नागपूरकरांना 'हा' इशारा
Nitin Raut
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 3:15 PM

नागपूर : ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषेदत त्यांनी नागपूरमधील गुन्हेगारी, पोलीस, कोरोना याविषयची माध्यमांना माहिती दिली. नागपूर शहर पूर्णपणे गुन्हेगारी मुक्त व्हावं आणि नागरिकांचे सहकार्य मिळावं, यासाठी पोलिसांची बैठक घेतली, असल्याचं सांगितलं. येणारे सणासुदीचे तीन महिने अत्यंत महत्वाचे आहेत. नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात डेल्टाप्लसचे रुग्ण आढळले आहेत. ते कधीही नागपूर पर्यंत पोहचू शकतं त्यामुळे त्यामुळं तिसरी लाट सुरू झालीय खबरदारी घेण्याची गरज असल्याचं नितीन राऊत म्हणाले आहेत.

दुसऱ्या लाटेत आपल्या जवळचे अनेक लोक गमावले

पोलिसांनी दुसऱ्या लाटेत खूप चांगलं काम केलं. दुसऱ्या लाटेत बेड्स मिळाले नाही. आम्ही मंत्री असूनही अनेकदा हतबल होतो. त्यामुळं अनेकांनी आपल्या जवळचे लोकं गमावले. आता संख्या नियंत्रणात असली तरी कोरोना संपलेला नाही, त्यामुळं काळजी घेण्याची गरज आहे.

नागपूरमधील ती घटना दुर्भाग्यपूर्ण

नागपूरात चार पाच दिवसांपूर्वी जी घटना घडली, मतिमंद मुलीवर बलात्कार झाला ती घटना दुर्भाग्यपूर्ण आहे. ही मुलगी बालसुधार होती, काहीवेळा ती बालसुधार गृहातून निघून गेली होती. ऑटो चालकांवर आपण विश्वास ठेवतो, मात्र या प्रकरणात आटो चालकांनी जे कृत्य केले त्याचे सर्व पुरावे कोर्टात ठेवले जाणार आहे, असं नितीन राऊत म्हणाले .

महेश राऊत आत्महत्या प्रकरणात सर्व माहिती घेतली, हा व्यक्ती अनेकदा पोलिसांना फोन करायचा. पोलीस ज्यावेळी त्याच्या कॉल केल्यावर तेव्हा तो दारू पिऊन होता.त्यामुळं दारू पिल्यानंतर त्याने विष प्राशन केले असेल तर त्याचा तपास केला जाईल.

सामान्य नागरिकांशी चांगलं वागण्याच्या सूचना

गेल्या सरकारच्या काळात नागपूरात गुन्हेगार वाढली असं म्हटलं जायचे, मात्र आमच्या सरकारच्या काळात गुन्हेगारी वाढू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. अनेकदा बिट मार्शल ची वागणूक नागरिकांसोबत चांगले नसते. त्यामुळं त्यांची वागणूक चांगली राहील अशा सूचना केल्या आहेत. डिटेक्शन रेट 5 टक्क्यांनी वाढलाय, असंही नितीन राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

“MPSC पॅनेलवर विदर्भातील ओबीसी सदस्य घ्या, केवळ पश्चिम महाराष्ट्रातील मराठे नकोत”

राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं आज नागपुरात अधिवेशन, ओबीसींची पुढची लढाई कशी, विचारमंथन होणार

Nitin Raut said corona delta plus variant patients found at Nashik at any time reach in Nagpur

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.