नागपूरकरांसाठी खुशखबर, अनेकांचं घरांचं स्वप्न अंतिम टप्प्यात; पीएम आवास योजनेच्या घरांची लॉटरी निघणार

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एनएमआरडीए कडून घरकुल योजना योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे.

नागपूरकरांसाठी खुशखबर, अनेकांचं घरांचं स्वप्न अंतिम टप्प्यात; पीएम आवास योजनेच्या घरांची लॉटरी निघणार
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 10:29 AM

नागपूर : नागपूर शहरातील रहिवाशांसाठी चांगली बातमी आहे. राज्याच्या उपराजधानीमध्ये सोमवारी 2 हजार 980 घरकुलांची लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाईन लॉटरी काढण्यात येणार आहे. पीएम आवास योजनेंअतंर्गत ही लॉटरी काढण्यात येईल.

पीएम आवास योजनेंतर्गत लॉटरी

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एनएमआरडीए कडून घरकुल योजना योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सोमवारी सकाळी 11 वाजता ऑनलाइन लॉटरी काढण्यात येणार आहे. यास योजनेसाठी 3 हजार 370 अर्ज प्राप्त झाले होते. एकूण 2 हजार 980 घरांसाठी लॉटरी काढण्यात येईल. त्यामुळे यात कोणाला लॉटरी लागणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

नागपूरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त वंदे मातरम सायकल रॅली

देशभरात 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह आहे. नागपूरातंही आज ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. कोरोनाच्या संकटात रक्तदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशानं देवता फाऊंडेशनकडून आज स्वातंत्र्य दिनी नागपूरात ‘वंदे मातरम सायकल रॅली’ काढण्यात आली. या रॅलीत अनेक तरुणांनी सहभाग घेतला आणि रक्तदान करण्याचं आवाहन केलं. कॅंसर पिडीत आणि इतर रुग्णांना रक्त मिळावं म्हणून ‘वंदे मात्र सायकल रॅली’ काढण्यात आली होती.

नागपूर मेट्रोमध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवासाची संधी

नागपूर मेट्रोनं शासकीय आदेशाप्रमाणे आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी/अधिकारी, तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले नागरिक यांच्यासाठी महत्वाचा निर्णय घेतलाय. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मेट्रो रेलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलीय. या निर्देशांप्रमाणे मेट्रोतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना दोन डोस घेतल्याचा पुरावा मेट्रो स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना द्यावा लागेल. महा मेट्रोच्या एक्वा आणि ऑरेंज या दोन्हीही मार्गिकांवर हे निर्देश आजपासून लागू होत आहेत.

इतर बातम्या:

नागपूर मेट्रोमधून प्रवास करण्यास मुभा, लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचा पुरावा दाखवणे बंधनकारक, वाचा नियम काय ?

कॅंसर पिडीत आणि इतर रुग्णांना रक्त मिळावं म्हणून नागपुरात ‘वंदे मातरम सायकल रॅली’

NMRDA will declare online lottery for homes of PM Awas scheme on 16 August

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.