NMC Budget | नागपूर मनपाच्या अर्थसंकल्पात करवाढ नाही, आयुक्तांनी सादर केला 2,669 कोटींचा अर्थसंकल्प

नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी सादर केलाला अर्थसंकल्प हा 2 हजार 669 कोटी रुपयांचा आहे. 2021-2022 चा सुधारित व 2022-23 चा प्रस्तावित असा हा एकत्रित अर्थसंकल्प आहे. कोणतीही करवाढ केली नसल्यानं नागरिकांना दिलासा देणारा असा हा अर्थसंकल्प आहे.

NMC Budget | नागपूर मनपाच्या अर्थसंकल्पात करवाढ नाही, आयुक्तांनी सादर केला 2,669 कोटींचा अर्थसंकल्प
नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना मनपा आयुक्त. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 2:20 PM

नागपूर : नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प आज मनपा आयुक्तांनी (Municipal Commissioner) सादर केला. या अर्थसंकल्पाकडून नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. 2022-23 च्या मनपाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ करण्यात आली नाही. नागपूरकरांना मालमत्ता कर ( Property Tax) आणि पाणीपट्टी (Water Supply) करवाढीचा बोजा नाही. नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी सादर केलाला अर्थसंकल्प हा 2 हजार 669 कोटी रुपयांचा आहे. 2021-2022 चा सुधारित व 2022-23 चा प्रस्तावित अ, ब व क असा हा एकत्रित अर्थसंकल्प आहे. मनपाचे उत्पन्न व खर्च यांचा तपशील सादर करण्यात आला. पाणीपुरवठा व मलनिस्सारण या विभागाचा अर्थसंकल्पही सादर करण्यात आला आहे. मनपाद्वारे संचालित परिवहन उपक्रमाकरिता अंदाजपत्रकात स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. शहरातील रस्ते पथदिवे, शिक्षण, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व मलनिस्सारण या सुविधा शहराच्या सर्व भागात उपलब्ध होतील, याकडं लक्ष देण्यात आलंय.

नागरिकांच्या सोयीसुविधा वाढविण्यावर भर

शहरातील नागरिकांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी, दर्जेदार विकासकामे उभी राहण्यासाठी विशेष लक्ष पुरविले आहे. याकरिता नागरिकांना दीर्घकाळ सुविधांचा वापर करता यावा. नागपूर शहर विकासाचे केंद्र म्हणून पुढं यावं, यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्न करत असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं. 2021-22 या अर्थसंकल्पात 2 हजार 392 कोटी 62 लाख रुपये निव्वड यंदाचे उत्पन्न असेल. सुरुवातीची शिल्लक 94 कोटी 25 लाख रुपये इतकी आहे. नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी सादर केलाला अर्थसंकल्प हा 2 हजार 669 कोटी रुपयांचा आहे. 2021-2022 चा सुधारित व 2022-23 चा प्रस्तावित असा हा एकत्रित अर्थसंकल्प आहे. कोणतीही करवाढ केली नसल्यानं नागरिकांना दिलासा देणारा असा हा अर्थसंकल्प आहे.

2,669 कोटी 33 लाखांचा अर्थसंकल्प

2021-2022 च्या सुरुवातीचे उत्पन्न दोन हजार 486 कोटी 87 लाख रुपये राहील. 2022-23 या वर्षाचे अंदाजित उत्पन्न दोन हजार 657 कोटी 13 लाख रुपये राहण्याचा अंदाज आहे. 2021-2022 या वर्षाचा एकूण खर्च दोन हजार 459 कोटी 31 लाख रुपये राहील. 2022-23 या वर्षातला एकूण खर्च दोन हजार 669 कोटी 33 लाख रुपये राहील. यात परिवहन उपक्रमाकरिता 2021-2022 मध्ये 108 कोटी 20 लाख रुपये तर 2022-23 करिता 100 कोटी इतकी रक्कम खर्चाकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Video Nagpur freestyle | सात युवतींमध्ये जोरदार फ्रिस्टाईल, भर रस्त्यावर सुरू आहे झटापट, नागपुरात व्हिडीओ व्हायरल

Nanded Murder : प्रेयसीच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी प्रियकराला 10 वर्षे सक्तमजुरी

Chandrapur Crime | चंद्रपुरातील युवतीचे हत्या प्रकरण, मुख्य आरोपी गजाआड, दोन मैत्रिणींच्या द्वेषातून हत्या?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.