MLA Krishna Khopde | कोरोनाबाधित आमदार आंदोलनात, नागपूर मनपाने बजावली नोटीस; कृष्णा खोपडेंचं स्पष्टीकरण काय?

संबंधित अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून बाहेर पडल्याचं खोपडेंचं स्पष्टीकरण आहे. गैरसमजीतून प्रकार घडला. त्यामुळे नोटिसीचा फेरविचार करण्याची विनंती आमदार खोपडे यांनी महापालिकेला केली आहे.

MLA Krishna Khopde | कोरोनाबाधित आमदार आंदोलनात, नागपूर मनपाने बजावली नोटीस; कृष्णा खोपडेंचं स्पष्टीकरण काय?
आंदोलनात सहभागी झालेले आमदार कृष्णा खोपडे
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 4:13 PM

नागपूर : भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना नागपूर महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कोरोनाबाधित असताना गृह विलगीकरणाचे नियम मोडले म्हणून ही नोटीस बजावली. कोविड नियम तोडले म्हणून कारवाई का करण्यात येऊ नये?, असे या नोटिसीत म्हटले आहे. तसेच चोवीस तासांत उत्तर सादर करण्याचे निर्देश मनपा अधिकाऱ्यांनी आमदार खोपडे यांना दिले आहेत. आमदार कृष्णा खोपडे यांनी मनपाला नोटिसीचं उत्तर दिलं. संबंधित अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून बाहेर पडल्याचं खोपडेंचं स्पष्टीकरण आहे. गैरसमजीतून प्रकार घडला. त्यामुळे नोटिसीचा फेरविचार करण्याची विनंती आमदार खोपडे यांनी महापालिकेला केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आमदार कृष्णा खोपडे यांनी मी पॉझिटिव्ह असल्याचे सोशल मीडियावर टाकले होते. त्यानंतर सहाव्या दिवशी ते घराबाहेर पडले. नाना पटोले यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी भाजपनं आंदोलन केलं. त्या आंदोलनात आमदार खोपडे सहभागी झाले होते. त्यामुळं त्यांनी गृहविलगीकरणाचे नियम मोडल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.

मनपाने नोटिसीत काय म्हटलंय

तेरा जानेवारीला आपण कोविड संक्रमित होतात. त्यामुळं एकोणवीस जानेवारीपर्यंत गृहविलगीकरणात राहणे बंधनकारक होते. पण, अठरा जानेवारीला आपण घराबाहेर पडलात. कोविड निर्बंधांचे पालन केलेले नाही. त्यामुळे आपल्याविरोधात कारवाई का करण्यात येऊ नये. चोवीस तासांत उत्तर देण्यात यावे, असं पत्र मनपा अधिकाऱ्यांनी आमदार कृष्णा खोपडे यांना पाठविलंय.

आमदार खोपडे यांचे उत्तर

मी पॉझिटिव्ह असलो तरी कोणत्याही प्रकारची लक्षणं नव्हती. सर्दी, खोकला, ताप काहीच नव्हता. आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मी घराबाहेर पडलो. नोटिसीचा सन्मान करून घराबाहेर पडणारा नागरिक आहे. गैरसमजुतीतून हा प्रकार झाला. त्यामुळं नोटिसीवर फेरविचार करून निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार खोपडे यांनी मनपाला केली आहे.

NMC Election | नागपूर भाजपात कोण करतंय गुलाम बनविण्याचा प्रयत्न; अविनाश ठाकरे यांच्या पोस्टने खळबळ, पोस्ट नेमकी काय?

Gondia ZP Election | प्रफुल्ल पटेलांच्या जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व; काँग्रेसच्या नाना पटोले यांनाही धक्का!

Bhandara ZP Election | भंडाऱ्यात 21 जागांसह काँग्रेस मोठा पक्ष, सत्तेच्या समीकरणासाठी काय करावं लागणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.