आता युवक काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह!; या युवा नेत्या विरोधात प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी

'राज्यात सत्तासंघर्ष, एमपीएससी वरून सुरू असलेलं वादळ तसेच येणाऱ्या निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी न घेता युवक प्रदेशाध्यक्ष व 'उत्तर' पुत्राची विदेशवारी' अशी टीका केलीय.

आता युवक काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह!; या युवा नेत्या विरोधात प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 1:32 PM

नागपूर : एकीकडे प्रदेश काँग्रेसमधील अंतर्गत वाद शमत नाही, तोच प्रदेश युवक काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलाय. प्रदेश काँग्रेसच्या सचिव श्रेया ठाकरे यांनी युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या संदर्भात एक ट्वीट केलंय. यात त्यांनी ‘कुणा’ला कळवत युवक प्रदेशाध्यक्ष झाले गायब!’ असा सवाल केलाय. तसंच ‘राज्यात सत्तासंघर्ष, एमपीएससी वरून सुरू असलेलं वादळ तसेच येणाऱ्या निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी न घेता युवक प्रदेशाध्यक्ष व ‘उत्तर’ पुत्राची विदेशवारी’ अशी टीका केलीय. कुणाल राऊत विदेशात होते. राज्यात अनेक घडामोडी घडत असताना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत विदेशात असल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सवाल उपस्थित केलाय. यावरून युवक काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय.

‘कुणा’ला कळवत युवक प्रदेशाध्यक्ष झाले गायब!

पुण्यात काँग्रेसने एमपीएसी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. परंतु, त्यात युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत दिसले नाही. युवकांचे प्रश्न असताना त्यासाठी युवक काँग्रेसचे नेतृत्व हवं होतं. ते कुठे केले होते, यावरून आता काँग्रेसमधूनचं टीका होऊ लागली. त्यामुळं जसं नाना पटोले यांना त्यांच्याच पक्षातले काही लोकं प्रदेश अध्यक्ष म्हणून नको आहेत. तशीच काहीशी टीका कुणाल राऊत यांच्यावर होत आहे. कुणाल राऊत नव्हते. मग कुणाला कळवत युवक प्रदेश अध्यक्ष गायब झाले होते, असा सवाल उपस्थित करण्यात आला. श्रेया ठाकरे यांनी हे ट्वीट एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन, कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक या पार्श्वभूमीवर केले आहे.

नाना पटोले यांच्या पाठोपाठ कुणाल राऊत यांना विरोध

नाना पटोले यांच्याविरोधात आशिष देशमुख थेट आरोप करत आहेत. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हटवा, अशी त्यांची मागणी आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव खान नायडू यासंदर्भात म्हणाले, नाना पटोले यांची काम करण्याची पद्धत ही दलित, मुस्लीम, आदिवासी यांच्या विरोधात आहे. हीच काँग्रेसची व्होटबँक आहे. नाना पटोले हे मनमानी पद्धतीनं काँग्रेसचं काम करत आहेत. राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना नाना पटोले विश्वासात घेत नाहीत. बैठकीतही कुणाचं बोलणं ऐकून घेत नाहीत. मी आता नानागिरी दाखवेन, असं म्हणतात, असा आरोपही खान नायडू यांनी केला. असाचं काहीसा विरोध कुणाल राऊत यांना होताना दिसत आहे. पक्षातीलचं पदाधिकारी ट्वीटवरून जाहीर नाराजी व्यक्त करत आहेत. कुणाला राऊत हे नितीन राऊत यांचे पुत्र आहेत. ते युवक काँग्रेसची निवडणूक जिंकून पदाधिकारी झाले. पण, आता त्यांच्यावरही योग्य पद्धतीने काम न करण्याचा ठपका या ट्वीटच्या माध्यमातून ठेवण्यात आला आहे.

'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.