Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक पुढे ढकलण्याची ओबीसींची मागणी, नागपूर प्रशासनाकडून मात्र जोमात तयारी, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

नागपूर जिल्ह्यात 16 जिल्हापरिषद आणि 31 पंचायत समितीच्या पोट निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. येथे 29 जुलैपासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरवात झाली आहे.

निवडणूक पुढे ढकलण्याची ओबीसींची मागणी, नागपूर प्रशासनाकडून मात्र जोमात तयारी, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 10:26 PM

नागपूर : एकीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेले असताना प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोमात तयारी सुरु केली आहे. नागपूर जिल्ह्यात 16 जिल्हापरिषद सदस्य आणि 31 पंचायत समितीच्या सदस्यांच्या पोट निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. येथे 29 जुलैपासून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरवात झाली आहे. (OBC demand postponement of elections but Nagpur government started process of filling candidature form)

16 जिल्हापरिषद, 31 पंचायत समितीच्या सदस्यांची पोटनिवडणूक

न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द ठरवल्यानंतर राज्यात ओबीसी समाजामध्ये असंतोष आहे. जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका राज्यातील विविध ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. मात्र, असे असले तरी न्यायालयाच्या निर्देशानुसार नागपूर प्रशासनाने निवडणूक कार्यक्रम राबवणे सुरु केले आहे. त्यानुसार 29 जूनपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 16 जिल्हापरिषद सदस्य आणि 31 पंचायत समितीच्या सदस्यांच्या पोट निवडणुका होणार आहेत.

19 जुलै रोजी मतदान,  20 जुलै रोजी मतमोजणी

नागपूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 1115 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तर 6 लाख 16 हजार 016 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यात 3 लाख 17 हजार 292 पुरुष तर 2 लाख 96हजार 721 महिला आणि 3 इतरांचा समावेश आहे. येत्या 5 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहेत. तर 6 जुलै रोजी अर्जांची छाणणी केली जाणार आहे. मतदान 19 जुलैला होईल. तर प्रत्यक्ष मतमोजणी 20 जुलै रोजी होईल.

बैठकीसाठी 50 लोकांना परवानगी असेल

दरम्यान, ही निवडणूक कोरोना नियम लक्षात घेऊन घेतली जाणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेऊन बैठकीसाठी 50 लोकांना परवानगी असेल. तर घरोघरी प्रचार करताना फक्त 5 जणांना एका ठिकाणी जाता येणार आहे. तशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

इतर बातम्या :

आषाढी वारीवरुन बंडातात्या कराडकरांचा राज्य सरकारला इशारा, समज देण्यासाठी पोलीस थेट कराडकरांच्या आश्रमात!

आमदार अंबादास दानवेंची बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण, क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार

डोक्यात फावडे घालून हत्या करणाऱ्या तिघांना बेड्या, शिर्डीतील पती-पत्नीच्या खुनाचा उलगडा

(OBC demand postponement of elections but Nagpur government started process of filling candidature form)

'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले.
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?.
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....