अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, शरद पवार नेमकं काय म्हणालेत?

या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवली पाहिजे.

अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, शरद पवार नेमकं काय म्हणालेत?
शरद पवार नेमकं काय म्हणालेत? Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 10:27 PM

गजानन उमाटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे आज भटके विमुक्त जमाती संघटना अधिवेशनाला नागपुरात उपस्थित होते. रेशीमबागमधील सुरेश भट सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला. सुरेश भट यांच्या कवितेतील ओळ शरद पवार यांनी म्हणून दाखवली. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं सुरेश भट म्हणत होते. भटक्या जमातीच्या उत्थानासाठी या मशाली पेटविणं गरजेचं असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार यांनी सांगितलं की, यासाठी खबरदारी घ्यायची असेल तरी घ्या. भटके विमुक्त जमाती संघटनांनी 50 वर्षे कष्ट केलेय, त्याचं स्मरण करतोय. एक काळ असा होता की हा समाज गुन्हेगारी आहे, असा उल्लेख केला जायचा. 1952 साली त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भटक्या विमुक्तांवरचा गुन्हेगारी ठप्पा पुसला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर होते. प्रमुख पाहुणे शाहू छत्रपती, वामन मेश्राम, लक्ष्मण माने उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, भटक्या विमुक्त समाजाची शोषणापासून मुक्ती झाली, असं आजंही वाटत नाही. यातून मुक्तीसाठी शक्तीशाली संघटना उभी करावी लागेल.

शाहू महाराजांनी लहान समाजाला सन्मान देण्यासाठी अनेक गोष्टी केल्यात. त्यांचे मार्ग वेगळे होते काही लोकांना ते आवडले नसेल.

भटक्यांचे अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मानाने जगण्याचा आधार देईल. या अन्याय अत्याचार करणाऱ्या शक्ती विरोधात मशाली पेटवली पाहिजे.

बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. औरंगाबादला शैक्षणिक सत्र सुरू केलं. फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव अग्रणी घेतलं जातं.

चार लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी मोफत शिक्षण घेतात. हे काम कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं.

संघटनेची शक्ती तुम्हाला सन्मान मिळवून देईल. जगण्याचं बळ देईल. संघटनेसाठी एकता असली पाहिजे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.