Nagpur | मकरसंक्रांतीच्या पार्श्वभुमीवर पोलीस ॲक्शन मोडवर, ड्रोनच्या मदतीनं पोलीस करणार कारवाई
नागपूरांनो पतंग उडविण्यासाठी वापरु नका नायलॉनचा मांजा, अन्यथा...
नागपूर – नागपुरात (Nagpur) बंदी असतानाही पतंग (Kite) खेळण्यासाठी नायलॅान मांजाची (Nylon Manja) सर्रास विक्री सुरु आहे. नायलॅान मांज्यामुळे प्रत्येकवर्षी असंख्य लोक जखमी होत आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये आतापर्यंत शेकडो पक्षांचा जीव जात आहे. नागपूर पोलिस नायलॅान मांज्याला आळा घालण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून वॅाच ठेवणार आहे. त्याचबरोबर पतंगाला नायलॅान मांजा दिसल्यास त्यावर सुध्दा कारवाई करण्यात येणार आहे.
मकरसंक्रांत जवळ आली आहे. त्यामुळे पोलिसांनी आतापासून नागपूरात सगळीकडे लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत नागपूरात मकरसंक्रांती दिवशी असंख्य पक्षी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर नागरिक सुध्दा जखमी झाले आहेत. कोणालाही इजा होऊ नये म्हणून पोलिसांनी आतापासून काळजी घ्यायला सुरुवात केली आहे.
आकाशात उडणाऱ्या पतंगीला नायलॅान मांजा असेल, तर पोलीसांचा ड्रोन त्या पतंग उडवणाऱ्यांचा शोध घेणार आणि नंतर पोलीस संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार आहे. मकरसंक्रातीच्या पार्श्वभुमीवर नागपूर पोलीसांचे पाच ड्रोन नायलॅान मांजाचा वापर करुन उडणाऱ्या पतंगीवर नजर ठेवणार आहे, अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीय.