जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार म्हणतात, जिथं चुकीचं असेल तिथं मी…

उपमुख्यमंत्र्यांनी माहिती देण्यास सांगितलं. त्यानंतर पुढचं काय ते ठरवू, असंही अजित पवार म्हणाले.

जयंत पाटील यांच्या निलंबनावर अजित पवार म्हणतात, जिथं चुकीचं असेल तिथं मी...
अजित पवार
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 8:36 PM

नागपूर : हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं. या निलंबनाविरोधत विरोधक एकवटले. सरकार अन्याय करत असल्याची भावना आहे. यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ३२ वर्षांची जयंत पाटील यांची कारकिर्द आहे. आम्ही त्यांना जवळून बघतो. त्यांचा स्वभाव शांत, संयमी आहे. पण, त्यांना टार्गेट करून निलंबन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांच्या कामकाजात निर्लज्जांसारखं का वागता तुम्ही. काही दिवसांची चर्चा होऊ द्या. विरोधकांनाही आपली बाजू मांडण्याचा संधी द्या. अशापद्धतीनं ते सांगत होते, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

सभागृहात स्पीकर हे सत्ताधारी पक्षालाच बोलण्याची संधी देत होते. विरोधी पक्षाला संधी देत नव्हते. शेवटी मी आठवण केल्यानंतर मला दिली. पण, त्यानंतर भाष्कर जाधव यांना बोलण्याची संधी दिली नाही. स्पीकर सत्ताधारी पक्षाला झुकत माप देतात. तरीही विरोधी पक्षाला त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे. तो त्याचा हक्का, अधिकार आहे. आयुधांचा वापर करून बोललं जातं. सत्ताधारी आणि विरोधक दोघांचही म्हणणं पुढं आलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

आदित्य ठाकरे यांच्यावर एसआयटी नेमण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी माहिती देण्यास सांगितलं. त्यानंतर पुढचं काय ते ठरवू, असंही अजित पवार म्हणाले. हे सरकार विरोधकांना टार्गेट करते. हे यातून निष्पन्न होते. दिशा सालियन प्रकरणाची तपासणी झाली. दिशाच्या आई-वडिलांनी सांगितलं की हा विषय तुम्ही काढू नका. आमच्या मुलीचा सारखा उल्लेख करू नका, असं सांगितलं. पण, तुमच्या राजकारणासाठी आमच्या मुलीला टार्गेट करू नका, अशीही वक्तव्य केली आहेत.

सत्ता त्यांची आहे. हम करो सो कायदा आहे. सत्ताधारी असल्यामुळं त्यांच्या हासतात पोलीस यंत्रणा आहे. सर्व विरोधी पक्षाचे सदस्य आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यात पवार कुटुंबाचे दोन सदस्य आहेत, तेही त्यांच्या पाठीशी आहेत. जे काही मला दिसते ते स्पष्ट बोलणारा माणूस आहे. उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. जिथं चुकीचं असेल, तिथं मी त्यांनी चुकीचं दाखविण्याचं काम करणार, असं अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.