नागपूर : आधार कार्ड.. देशभरात तुमची आमची ओळख सिद्ध करण्याचा सर्वात मोठा पुरावा. नागपुरात असेच शंभरपेक्षा जास्त आधारकार्ड (Aadhaar Card.) एका भंगारवाल्याकडे सापडलेत. एका भंगारवाल्याकडे ऐवढ्या मोठ्या संख्येनं आधारकार्ड आढळल्यानं सर्वत्र खळबळ उडालीय. नागपुरातील मेकोसाबाग (Mekosabag) परिसरातील भंगारवाल्याकडे हे आधारकार्ड आढळून आलेत. एवढ्या मोठ्या संख्येनं आधारकार्ड एका भंगारवाल्याकडे (Bhangarwala) आले कसे? हे आधारकार्ड नेमके कुणाचे आहेत? या आधारकार्डचा काही गैरवापर झाला का? याचा तपास करण्याची गरज आहे. कारण आधारकार्डचा गैरवापर झाल्यास त्याचा मोठा फटका संबंधीत कार्डधारकाला होऊ शकतो.
कचऱ्यातून आधारकार्ड मिळाल्याचं सांगत, हा भंगारवाला वीस रुपयांत आधारकार्डची विक्री करत होता. जरीपटका पोलिसांनी याची चौकशी सुरु केलीय. आम आदमी पार्टीने स्टींग ॲापरेशन करत, हा प्रकार उघडकीस आणला, अशी माहिती संघटनमंत्री प्रभात अग्रवाल यांनी दिली. भंगारवाला हा साधाभोळा व्यक्ती दिसतो. फक्त वीस रुपयांत तो आधारकार्ड परत करत आहे. याचा अर्थ बल्कमधीलच आधारकार्ड गहाळ होण्याची शक्यता आहे. पोलीस याचा शोध लावत आहेत. नेमकं काय घडलं हे त्यांच्या तपासानंतर उघड होईल. पण, तरीही नागपुरात हा चर्चेचा विषय झाला आहे.
आधार कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा. पण, एवढे सारे आधारकार्ड भंगालवाल्याकडं आलेच, कसे असा प्रश्न निर्माण होतो. भंगारात येवढे कार्ड सापडले. याचा अर्थ ते कुणीतही फेकून दिले असावेत. ही किमया एखाद्या पोस्ट मॅननं तर केली नाही ना अशी शंका येते. यापूर्वी पत्र न पोहचविता रद्दीत सापडल्याच्या घटना घडल्या आहेत. असा हा प्रकार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तरीही या प्रकरणाचा योग्य तपास केल्यास नेमकं काय घडलं ते समोर येईल.
दादरच्या डायमंड ज्वेलरीतील चोरी क्राईम पेट्रोल पाहून; चोरट्यानं सीसीटीव्हीचा ड्राईव्हही पळविला होता
माझी पत्रकार परिषद खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, संजय राऊत उद्या काय “बॉम्ब” फोडणार?