नागपूर : धरमपेठेतील सुजान शर्मा (Sujan Sharma) (वय 22) हा कायद्याचे शिक्षण घेतो. त्याचा पीडितेशी संपर्क झाला. मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यानंतर दोघांचीही जवळीकता वाढली. हे नाते त्याही पुढे गेले. तिचा त्याच्यावर विश्वास बसला. सुजाननं तिला एक दिवस घरी नेले. तिथं ती नको ते करून बसली. त्यानंतर अशा घटना वारंवार होऊ लागल्या. तीनं त्याला लग्नाविषयी विचारणा केली. त्याकडं त्यानं दुर्लक्ष केलं. तिला टाळण्याचा प्रयत्न करू लागला. सुजाननं त्याचा मित्र वृषभ गजभिये (Vrishabh Gajbhiye) याचा नंबर दिला. काय ते त्याच्याशी बोलं, असं सांगितलं. त्यानंतर सुजाननं तिचे फोन घेणे बंद केले. ती वृषभकडं गेली. त्यानं तिला सुजानशी बोलून लग्नाबाबत ठरविण्याचे आश्वासन दिले. बोलणी करायला त्याने तिला चंद्रपूरला बोलावले. ती तिथं गेली. वृषभने चंद्रपुरात (Chandrapur) एका हॉटेलवर तिला बोलावले. त्याठिकाणी जबरदस्ती केली. हा सारा घटनाक्रम जानेवारी ते एप्रिलमध्ये घडला.
एकानं लग्नाच्या आमिषाने तर दुसऱ्यानं सेटलमेंट करून देतो. म्हणून तिला जवळ केले. तिचा गैरफायदा घेतला. आता कुणाकडं दादा मागायची असा प्रश्न तिला पडला. शेवटी तिने हिंगणा पोलिसांत तक्रार दिली. दोघांनीही आपला गैरफायदा घेतला. त्यामुळं पीडित तरुणी निराश झाली. तीने शेवटी हिंगणा पोलिसांत तक्रार केली.
दुसऱ्या एक घटनेत, हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत, आई-वडील कामावर गेल्यानंतर तेरा वर्षीय मुलगी घरी एकटीच होती. वैभव बोंडवे या 21 वर्षीय तरुणानं तिच्यावर अत्याचार केला. वैभवनं मुलगी घरात एकटी पाहून आत शिरला. त्याच्यावर जबरी अत्याचार केला. पीडितेचे आईवडील कामावरून आले. तेव्हा ती रडत बसली होती. पीडितेच्या वडिलांनी हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.