आधी फेसबूकवरून मैत्री नंतर ऑनलाईन चॅटिंग, मिटिंग आणि…! नागपुरातील विवाहितेची पोलिसांत धाव
एका विवाहित महिलेची फेसबूकवरून एका व्यक्तीसोबत मैत्री झाले. या मैत्रीचे रूपांतर ऑनलाईन चॅटिंगमध्ये झाले. त्यानंतर मिटिंग फिक्स झाली. तिथं नको ते झाले. त्यामुळं विवाहितेला पोलिसांत धाव घ्यावी लागली.
नागपूर : तक्रारदार महिला ही एकतीस वर्षांची आहे. ती एक ब्युटी पार्लर चालविते. फेसबूकवरून तिची मैत्री (Her Friendship on Facebook) ही कोमलसिंह नावाच्या व्यक्तीसोबत झाली. त्यानंतर त्यांचे ऑनलाईन चॅटिंग (Online Chatting) सुरू झाले. आरोपीने तिला जाळ्यात ओढण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पीडित महिलेला दोन मुले आहे. तिचे पती बाहेर गेल्यानंतर कोमलसिंह जुजवा तिच्या घरी जात होता. एकदा तर तिच्या मित्राच्या फ्लॅटवर घेऊन गेला. तिथं दोघांचाही तोल सुटला. खासगी क्षण त्याने कॅमेऱ्यात टिपून ठेवले. अश्लील फोटो काढून त्याचा व्हिडीओ बनविला. काही दिवसांनंतर हे खासगी क्षण त्याने तिच्या मैत्रिणीला पाठविले. यावरून पीडितेने त्याला समज दिली. त्यानंतर कपीलनगर पोलिसांत (Kapilnagar Police) तक्रार दाखल केली. पोलिसांनी कोलमसिंहला अटक केली आहे.
खात्यातून नऊ लाख रुपये उडविले
दुसऱ्या एका प्रकरणात अज्ञात व्यक्तीने खात्यातून नऊ लाख रुपये उडविल्याची घटना उघडकीस आली. वर्क कॅपिटल फायनान्स कंपनीत कार्यरत एक कर्मचारी आहे. त्याच्या खात्यातून ही रक्कम उडविल्याची घटना सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत पाच फेब्रुवारीला घडली आहे. अमरावती रोडवरील गोरेपेठ येथील राजेश कृष्णगोपाल लखोटिया असं तक्रारदाराचं नाव आहे. लखोटिया रामदासपेठच्या पुष्पकुंज अपार्टमेंट येथील वर्क कॅपिटल फायनान्स कंपनीत कार्यरत आहेत. पाच फेब्रुवारीला दुपारी लखोटिया यांच्या बँक खात्यातून अज्ञात आरोपीने ही रक्कम ट्रान्सफर केली. मोबाईलवर मेसेज येताच त्यांची झोप उडाली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला.