Nagpur Murder: नागपूर हादरले! एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, गाडीवर बसवले, अत्याचार केला नि चाकूने भोसकले

मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास शिकवणी वर्गासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. सकाळी 11 वाजेपर्यंत ती घरी परत आली नाही. त्यामुळं तिच्या आई-वडिलांनी मैत्रिणींकडे चौकशीही केली. ती क्लास आटोपून धीरज शेंडेसोबत मोटरसायकलवर गेल्याची माहिती काही मुलींनी तिच्या आईवडिलांना दिली. ती रात्रीपर्यंत घरी परत आली नव्हती.

Nagpur Murder: नागपूर हादरले! एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या, गाडीवर बसवले, अत्याचार केला नि चाकूने भोसकले
एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 10:06 AM

नागपूर : नागपुरात धक्कादायक घटना उघडकीस आली. 19 वर्षीय युवकानं एक अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या केली. तिला गाडीवर बसविले. तुझे दुसऱ्याशी अफेअर सुरू आहे. हे बरोबर नाही, असे धमकावले. त्यानंतर तिला जंगलात नेले. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तू माझी नाही तर दुसऱ्या कुणाचीही होणार नाही, असं म्हणून तिच्यावर चाकूने सपासप वार केले. यात अल्पवयीन 15 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह मौदा पोलिसांना ( Mouda Police) काल सापडला. संशयावरून आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याने खून केल्याची कबुली (Confession of Murder) दिली. मौदा तालुक्यातील भामेगाव येथील धीरज शेंडे असं आरोपीचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून (One Sided Love) ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अशी घडली घटना

सदर मृत विद्यार्थिनी ही 15 वर्षांची आहे. ती शिवाजीनगर, मौदा येथे राहत होती. मंगळवारी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास शिकवणी वर्गासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. सकाळी 11 वाजेपर्यंत ती घरी परत आली नाही. त्यामुळं तिच्या आई-वडिलांनी मैत्रिणींकडे चौकशीही केली. ती क्लास आटोपून धीरज शेंडेसोबत मोटरसायकलवर गेल्याची माहिती काही मुलींनी तिच्या आईवडिलांना दिली. ती रात्रीपर्यंत घरी परत आली नव्हती. त्यामुळं कुटुंबीयांनी मौदा पोलिसांत तक्रार दाखल केली. मौदा पोलिसांनी बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मौदा शहरातील शिवाजीनगर भागातून धीरजला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची विचारपूस केली. त्यानंतर त्याने रात्री तिचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली.

अत्याचारानंतर खुनाची कबुली

मौदा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तिचे दुसर्‍या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय असल्याची माहिती धीरजने पोलिसांना दिली. याच संशयापोटी त्याने तिला बळजबरीने मोटरसायकलवर बसवून साळवा शिवारातील जंगलात नेले. सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर भांडण करीत चाकूने वार करून तिची हत्या केली. दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेहच सापडला. एकतर्फी प्रेमातून धीरजनं ही हत्या केली. आता त्याला पोलिसांच्या कोठडीत दिवस काढावे लागतील. शिवाय अत्याचार केल्याचाही गुन्हा त्यानं कबुल केला.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.