कर्नाटकचे संसदीय मंत्री म्हणतात, मुंबई आमची, सुनील राऊत यांची प्रतिक्रिया काय?
सुनील राऊत यांनी सांगितलं की, शिवसेना एकच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. बाकी कुठंलीही शिवसेना आम्हाला माहिती नाही.
नागपूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मंत्री वक्तव्य करत आहेत. संसदीय मंत्री मधू स्वामी यांनी मुंबई आमची असा दावा केला आहे. त्यावर बोलताना भांडुपचे आमदार सुनील राऊत म्हणाले, कर्नाटकात काय दावा केला. याला मुंबईत, महाराष्ट्रात किंमत दिली जाणार नाही. १०५ हुतात्मे घेऊन मुंबई मिळवलेली आहे. या मुंबईवर फक्त मराठी माणसाचाच हक्क आहे. मुंबई फक्त मराठी माणसाचीच आहे, असं वक्तव्य सुनील राऊत यांनी केलं. कोणी काय दावे केले याला आम्ही शून्य किंमत देतो
मुंबईत २० टक्के कानडी भाषिक आहेत. त्यामुळं मुंबई आमची असल्याचा दावा कर्नाटकचे मंत्री करतात. महाराष्ट्राच्या विधानभवनात सीमावादावर ठराव घेण्यात आला. तरीही कर्नाटकचे मंत्री शांत बसण्याचे नाव घेत नाहीत. त्यावर बोलताना सुनील राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना ते किंमती देत नाहीत. आधीचं केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या. तिथं झाल्याल्या ठरावांचं पालन केलं गेलं पाहिजे. कुणीही विनाकारण काही बोलू नये.
उद्धव ठाकरे यांनी बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी केली होती. त्यावर आता कर्नाटकी मंत्री हे मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करत आहेत. त्यावर बोलताना सुनील राऊत यांनी सांगितलं की, बेळगावात मराठी माणसांची मुस्कटदाबी होत आहे. मराठी माणसांवर अन्याय अत्याचार केला जात आहे. बेळगावच्या मागणीला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई मराठी माणसाच्या बापाची असल्याचं कर्नाटकला सांगावं लागेल.
सुनील राऊत यांनी सांगितलं की, शिवसेना एकच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. बाकी कुठंलीही शिवसेना आम्हाला माहिती नाही. उद्धव ठाकरे, संजय राऊत हे अजूनही नागपुरात आहेत. ते बाँबस्फोट करतील. रोज काहीतरी होत आहे. एकदा टाईम बाँब लावला जाईल. चिंता करू नका.